Bhokardan Assembly Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Bhokardan Assembly Constituency : दहा वर्षात केलेल्या विकास कामांची निधीसह यादी देतो, विरोधकांनी दहा कामे सांगावी..

Raosaheb Danve's challenge to opponents, name ten works : तालुक्याचा व जिल्ह्याचा संपूर्ण विकास डोळ्यासमोर ठेवून सर्व नद्यांवर केटीवेअर मंजूर करून आणले. विरोधकांकडे टीका करण्यासाठी कुठलेही मुद्दे नसून राजकारणात खालच्या पातळीवर टीका करणे एवढेच काम त्यांना उरले आहे

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : विरोधकांनी त्यांच्या काळात केलेली मतदार संघातील किमान दहा कामे सांगावी, मी दहा वर्षातील शंभर कामांची निधीसहित यादी देतो. हिंमत असेल तर एका व्यासपीठावर येऊन विकास कामांच्या मुद्द्यावर बोला, असे जाहीर आव्हान माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना दिले. भोकरदन जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संतोष दानवे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्धाटन दानवे यांच्या हस्ते नुकतेच झाले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रावसाहेब दानवे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. (Raosaheb Danve) विरोधक हे विकास काम आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मूग गिळून घेऊन गप्प बसले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत मराठा आरक्षणावर व्यासपीठावरील राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार, विद्यमान खासदार आणि महाविकास आघाडीतील एकही नेत्याने ब्र शब्द काढला नाही.

जातीयवाद ,संविधान खतरे मे व धार्मिक मुद्द्यांवरून जनतेला कन्फ्युज करण्यात लोकसभेला विरोधक यशस्वी झाले, पण विधानसभेला त्यांची डाळ शिजणार नाही. पंधरा वर्षे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भारनियमनात ठेवणारे काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आणि महायुतीच्या काळात आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला मुबलक प्रमाणात वीज,स्वतंत्र रोहित्र आता तर 33 केव्ही सबस्टेशन सौर उर्जेवर करण्याचे काम सुरू केले आहे.

आम्ही मतदान आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकास काम आणि निधी आणत नाही. तालुक्याचा व जिल्ह्याचा संपूर्ण विकास डोळ्यासमोर ठेवून सर्व नद्यांवर केटीवेअर मंजूर करून आणले. (Santosh Danve) विरोधकांकडे टीका करण्यासाठी कुठलेही मुद्दे नसून राजकारणात खालच्या पातळीवर टीका करणे एवढेच काम त्यांना उरले आहे, असा टोलाही दानवे यांनी लगावला.

महायुतीचे उमेदवार संतोष दानवे हे तिसऱ्यांदा भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. विकासाच्या मुद्यावरच आपण जनतेमध्ये जात आहोत. दहा वर्षात मतदारसंघात केलेले काम लोकांच्या समोर आहे. याची पोच पावती म्हणूनच मतदारांनी मला दोनवेळा आशिर्वाद दिला. आता तिसऱ्यांदा निश्चितच ते माझ्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास संतोष दानवे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT