Raosaheb Danve News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : भाजप सर्वात शक्तीमान पक्ष, संधीचं सोनं करा...

Bjp : देशात सुबत्ता आणण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे.

सरकारनामा ब्युरो

Parbhani : मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील प्रमुख व्यवसाय हा शेती असल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल इतर राज्यातील बाजारपेठेत नेण्यासाठी मराठवाड्यातून किसान रेल सुरू केली जाईल. (Raosaheb Danve News) याचा फायदा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. भाजप देशातील सर्वात शक्तीमान पक्ष आहे, या संधीचं सोनं येणाऱ्या काळात करून घ्या, असे आवाहन देखील दानवे यांनी केले.

भाजप महाजनसंपर्क अभियानातंर्गतमेळाव्यात ते बोलत होते. (Bjp) भाजप सरकार सत्तेत येण्याआधी महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला केवळ १ हजार १०० कोटी रुपये दिले जात होते. परंतू २०१४ नंतर महाराष्ट्रातील रेल्वेविकासाच्या कामासाठी तब्बल १२ हजार कोटी रुपये दिले गेले. (Raosaheb Danve) केंद्रात भाजपची सत्ता येण्या आधी देशातील ४० टक्के लोकांना बॅकेचे दरवाजे माहित नव्हते. परंतू सर्वांचे बॅक खाते काढल्यानंतर या ४० टक्के लोकांची पत बॅकेत निर्माण झाली.

या बॅक खात्यामुळे आता विविध अनुदानाची रक्कम थेट लाभार्थांच्या खात्यावर येते. पूर्वी १०० रुपये सरकारने दिले तर लाभार्थ्याला केवळ १५ रुपये मिळत असतं, आता पूर्णच्या पूर्ण रक्कम त्याच्या खात्यावर जमा होत आहे. (Marathwada) कोरोना संसर्गाच्या काळात अनेक बलाढ्य देशात मृत्युचे तांडव सुरु झाले होते. परंतू केवळ भारत देशात सर्वात कमी मृत्यु झाले. त्याचे एकमेव कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच घेतलेली खबरदारी आणि केलेल्या उपाययोजना.

त्यामुळे आपण सर्वजण सुरक्षित राहिलो, हे काम मोदी सरकारने केले आहे. देशात सुबत्ता आणण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. आता राज्या - राज्यात व जिल्ह्यात - जिल्ह्यात भाजप सर्वशक्तीमान राजकीय पक्ष म्हणून समोर आलेला आहे. त्यामुळे या संधीचे कार्यकर्त्यांनी सोनं केले पाहिजे, असे आवाहन देखील दानवे यांनी केले.

देशात सत्ता, राज्यात शिवसेनेसोबत सत्ता असतांना गोरगरीब वंचिताची कामे करण्याचे ध्येय भाजप सरकारने उराशी बाळगले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही आपल्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून भाजप सरकारच्या ९ वर्षाच्या कारकिर्दीचा यशस्वी लेखाजोखा जनतेपर्यंत न्यावा, असे आवाहनही दानवे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT