Parbhani Loksabha News : परभणी लोकसभा शिंदेंची शिवसेनाच लढवणार, पहिल्यांदाच घेतली जाहीर भूमिका..

Shivsena : १९८९ साली शिवसेनेकडून प्रा. अशोक आनंद देशमुख यांनी पहिल्यांदाच खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला.
Hingoli Loksabha News
Hingoli Loksabha News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीसह सत्ताधारी भाजप या तयारीत आघाडीवर असतांना शिंदे गटात मात्र शांततेचे वातावरण होते. (Parbhani Loksabha News) शिवाय लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला किती जागा मिळणार? कोणत्या मतदारसंघातून ते लढणार? याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही. शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेल्या अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने तयारी सुरू केली तरी शिंदे गटाचे खासदार मौन बाळगून आहेत.

Hingoli Loksabha News
MP Sanjay Jadhav : ...उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; वर्षानुवर्षे पायी वारी करणारे खासदार जाधवांचं पांडुरंगाला साकडं!

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला गप्प बसायला सांगितल्याचे ते सांगतात. परंतु पहिल्यांदाच शिंदे गटाने जाहीर भूमिका घेत (Parbhani) परभणी लोकसभा मतदारसंघात बैठक घेत जागेवर दावा केला आहे. माजी राज्यमंत्री शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते अर्जून खोतकर यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत लोकसभेची तयारीबाबत आढावा घेतला. (Shivsena) त्यामुळे परभणीची जागा शिंदेंची शिवसेनाच लढवणार, असे दिसते. भाजपने देखील या मतदारसंघातून लढण्याची स्वतंत्रपणे तयारी सुरू केली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीतच भाजपने या मतदारसंघातून लढण्याची तयारी केली होती. परंतु शिवसेने सोबत युती झाल्यामुळे त्यांनी आग्रह सोडला होता. (Marathwada) राज्यातील सत्तातंर, शिवसेनेत पडलेली फूट पाहता भाजप परभणी लोकसभेवर दावा सांगत आहे. इथे ठाकरे गटाचे संजय (बंडू) जाधव हे विद्यमान खासदार आहेत. शिंदेंच्या नेतृत्वाखालील बंड झुगारत त्यांनी ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. परभणी लोकसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे.

त्यामुळे शिंदे गटाकडून या मतदारसंघावर दावा असणारच आहे. आता भाजप हा दावा कितपत मानतो? जागा शिंदे गटाला मिळते का? हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल. सलग आठ वेळा या मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार विजयी होत आलेला आहे. परभणी लोकसभा मतदार संघात नवव्या लोकसभेपासून शिवसेनेने आपले स्थान पक्के केले. १९८९ साली शिवसेनेकडून प्रा. अशोक आनंद देशमुख यांनी पहिल्यांदाच खासदार म्हणून लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९९१ साली परत त्यांना शिवसेनेने संधी दिली, त्यातही ते विजयी झाले.

१९९६ साली अॅड. सुरेश रामराव जाधव हे शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेत पोहचले. परंतु, मध्यावधी निवडणुका लागल्याने त्यांचा कार्यकाळ केवळ २ वर्षांचाच राहीला. १९९८ साली कॉंग्रेसचे सुरेश वरपुडकर हे पहिल्यांदाच खासदार म्हणून लोकसभेत गेले. परंतु, त्यांचाही कार्यकाळ केवळ १ वर्षाचाच राहिला. त्यानंतर १९९९ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत परत एकदा शिवसेनेच्या तिकिटावर अॅड. सुरेश जाधव हे खासदार पदी विराजमान झाले. तेव्हापासून आतापर्यंत शिवसेनेच्या उमेदवाराने या मतदार संघात पराजय पाहिलेला नाही.

Hingoli Loksabha News
Sanjay Raut on Deepak Kesarkar : दीपक केसरकरांनी ती गोष्ट लपवली, त्यांना अटक करा; संजय राऊतांची मागणी

२००४ ते २००९ या काळात अॅड. तुकाराम रेंगे पाटील हे या मतदार संघाचे खासदार म्हणून विजयी झाले. २००९ ते २०१४ या काळात अॅड. गणेशराव दुधगावकर हे शिवसेनेचे खासदार होते. २०१४ ते २०१९ आणि २०१९ ते आजपर्यंत संजय जाधव हे शिवसेनेचे खासदार म्हणून मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. हा पुर्व इतिहास नजरेसमोर असल्यामुळेच ही जागा शिवसेनाच लढविणार आहे.

या जिल्ह्यातील मतदार हा शिवसेनाप्रमुखांच्या विचारांवर व धनुष्यबाण चिन्हावर प्रचंड प्रेम करणार आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह परभणीतील शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या मतदारांनी शिवसेनेला मिळवून दिले आहे. म्हणून येणारी लोकसभा निवडणूक ही शिवसेना लढवणार असून, यासाठी बूथ प्रमुख, शिवदूत नेमणुकीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असे शिवसेनेचे उपनेते तथा परभणी लोकसभा संपर्क प्रमुख अर्जुन खोतकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com