Raosaheb Danve News  Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : दानवेंनी वारीत फुगडी घातली, चहाही बनवला..

Maharashtra : चहावाल्याला तू बाजूला सरक, मी चहा बनवतो म्हणत, त्यांनी हातात चमचा घेवून चहा हटवायला सुरुवात केली.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कायम चर्चेत राहण्याची संधी शोधत असतात. आषाढी एकादशी निमित्त सध्या सगळ्याच राजकीय नेत्यांची पावले पंढरपुरच्या दिशेने निघाली आहेत. (Raosaheb Danve News) रावसाहेब दानवे यांनी देखील पंढरपूरला जावून विठूरायाचे दर्शन घेतले. वाटेत पायी निघालेल्या वारकऱ्यांसोबत फुगडी घातली.

एवढच नाही तर एका रस्त्याच्या कडेला असलेल्या हाॅटेलमध्ये जावून स्वतः चहा बनवला आणि तो वारकऱ्यांना पाजला. (Raosaheb Danve) दानवे यांच्या या कलेला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. (Jalna) रावसाहेब दानवे कायम चर्चेत राहणारा चेहरा, मग त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते.

मतदारसंघात दौरा करत असतांना एखाद्या झाडाखाली बसलेल्या वृद्धाशी गप्पा असो, की बैलगाडी, बुलेट, ट्रॅक्टरवर स्वार होत रपेट मारणे. (Bjp) त्यांच्या या निरनिराळ्या प्रयोगांमुळे ते कायम माध्यमांचे लक्ष आपल्याकडे केंद्रीत करून घेतात. अशीच संधी आषाढी निमित्त पंढरपूरात दर्शनाला जातांना दानवेंनी हेरली.

वारीतील एका आजीसोबत दानवे फुगडी खेळले. त्यानंतर एका आजोबांसोबतही त्यांनी फुगडी घातली. यावेळी दानवेंचा उत्साह पाहण्यासारखा होता. सोबत बदनापूरचे आमदार नारायण कूचे व भाजपचे पदाधिकारी देखील होते. फुगडी घालून पुढे गेल्यावर त्यांनी एका चहाच्या टपरीत प्रवेश केला.

चहावाल्याला तू बाजूला सरक, मी चहा बनवतो म्हणत, त्यांनी हातात चमचा घेवून चहा हटवायला सुरुवात केली. चहा तयार झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी सगळ्यांना तो पाजलाही. त्यानंतर दानवेंचा ताफा पुढे निघाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT