Omraje-Kailas Patil News : कैलास पाटील, ओमराजे ; आमदार, खासदारांची हटके जोडी..

Shivsena : जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद पक्ष फुटीनंतरही कायम आहे, त्याला या दोघांमधील समन्वय आणि समजुतदारपणा कारणीभूत.
Omraje-Kailas Patil News
Omraje-Kailas Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv : राजकारणात कायम कोणी कोणाचा मित्र अन् शत्रू नसतो असं नहेमीच म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधीमध्ये हेवेदावे, मतभेद, कुरघोडीचे राजकारण पहायला मिळते. (Omraje-Kailas Patil News) उस्मानाबादचे शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्याच पक्षाचे उस्मानाबाद-कळंबचे विद्यमान आमदार कैलास पाटील हे मात्र त्याला अपवाद ठरले आहेत.

Omraje-Kailas Patil News
Ambadas Danve On Kendrekar : केंद्रेकरांना स्वेच्छा निवृत्ती घ्यायला भाग पाडले, दानवेंचा आरोप..

२०१७ ते २०२३ या सहा वर्षात या दोघांमधील समन्वय, एकोपा वाखाणण्याजोगा आहे. कैलास पाटील राष्ट्रवादीतून शिवसेनेत येण्याला कारण देखील ओमराजेच ठरले. (Shivsena) जिल्ह्यातील बलाढ्य नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणाजगजीतसिंह पाटील यांचे खंदे समर्थक अशी (Kailas Gahdge Patil) कैलास पाटलांची ओळख होती. परंतु २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राणा पाटलांनी खंद्या समर्थकाऐवजी दुसऱ्याला उमेदवारी दिली आणि कैलास पाटील नाराज झाले.

ही संधी ओमराजे यांनी हेरली आणि कैलास पाटील यांना थेट जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आणि दीड हजाराहून अधिक मतांनी निवडूनही आणले. (Omraje Nimbalkar) ओमराजे यांनी त्यावेळी दाखवलेला विश्वास पाटील यांच्यासाठी त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी महत्वाचा ठरला. राजकारणातील गाॅडफादर म्हणून ते ओमराजे यांना मानतात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर ओमराजे यांनी त्यांना जिल्हाप्रमुखही केले.

त्यानंतर थेट विधानसभेची उमदेवारी आणि आमदार केले. सहा वर्षातील हा वेगवान राजकीय प्रवास ओमराजे यांच्यामुळेच शक्य झाला याची जाणीव कैलास पाटील यांना असल्याने ते कायम खासदार ओमराजे यांच्यासोबत असतात. गेल्या सहावर्षात जिल्ह्यातील या दोन नेत्यामध्ये कधी वाद, खटका उडाल्याचे ऐकिवात नाही. यामागे देखील काही कारण आहेत, त्यापैकी एक म्हणजे हे एकमेकांचे स्पर्धक नाही. दोघेही आपापले मतदारसंघ सांभाळून आहेत.

ओमराजे यांनी २०१९ ला जेव्हा लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा कैलास पाटील यांच्यासाठी त्यांनी उस्मानाबाद-कळंब हा आपला विधानसभा मतदारसंघ सुरक्षित मानला. गेल्या चार वर्षात ही आमदार-खासदाराची जोडी जिल्ह्यात शेकडो वेळा विविध बैठका, मेळावे, कार्यक्रमातून एकत्र दिसली. पण त्यांच्या कधीही वाद झाल्याचे दिसले नाही. जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद पक्ष फुटीनंतरही कायम आहे, त्याला या दोघांमधील समन्वय आणि समजुतदारपणा कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

Omraje-Kailas Patil News
Danve-Sattar News : जालना-जळगाव रेल्वे रुळावर, दानवे-सत्तार जोडीने करून दाखवले..

याशिवाय राणा पाटील यांच्यासारखा तगडा विरोधक समोर असतांना आपापसात वाद, मतभेद करून नुकसान दोघांचेच होणार ही समज असल्याने ते एकोप्याने राहतात, अशीही चर्चा आहे. इतर राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधींनी देखील बोध घ्यावा, असे ओमराजे आणि कैलास पाटील यांचे वर्तन आहे. उद्या आषाढी एकादशी आहे, या निमित्ताने हे दोघेही विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र गेले आहेत.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात खासदार संजय जाधव यांच्यासमवेत बाजीराव विहीर, वाखरी येथे पार पडलेला गोल रिंगण सोहळ्याचा अनुभव त्यांनी घेतला. पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेले असंख्य वारकरी ओठांवर विठ्ठलाचे नाव, हातात टाळ-मृदुंग-पताका पायांना लागलेली पंढरीची ओढ हे सगळं पाहूंन मनाला अध्यात्मिक शांती लाभते. "हा सुख सोहळा स्वर्गी नाही" याची पावलोपावली प्रचिती देणारा हा सोहळा प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा, अशा भावना या निमित्ताने या जोडीने व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com