मराठवाडा

Raosaheb Danve News : मोदींनी देश आणि संघटनेला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिली...

Bjp : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह व ऊर्जा निर्माण झाली.

सरकारनामा ब्युरो

Jalna : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुथ कार्यकर्त्यापासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली आणि आज ते देशाचे नेतृत्व करत आहेत. (Raosaheb Danve News) खऱ्या अर्थाने पंतप्रधानांनी देश आणि संघटनेला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिली, असे गौरवोद्दगार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काढले.

भोकरदन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या `मेरा बुथ सबसे मजबुत` या कार्यक्रमात दानवे (Raosaheb Danve) पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यासह सहभागी झाले होते. (Narendra Modi) कार्यक्रम संपल्यानंतर दानवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि मोदींनी संघटनेला आणि देशाला जागतिक पातळीवर कसे मानाचे स्थान मिळवून दिले हे सांगितले.

दानवे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह व ऊर्जा निर्माण झाली आहे. (Bjp) पंतप्रधानांनी आपले आयुष्य संघटनेच्या कार्यात घालवले, बूथ स्तरावरून काम पाहून देशाचे नेतृत्व करत देश आणि संघटनेला त्यांनी जागतिक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.

मोदींजींचा हा संवाद मला व भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याला सार्वजनिक सेवा आणि राष्ट्र उभारणीसाठी कायम उर्जा देत राहील. देशासाठी काम करणाऱ्या भाजपच्या समर्पित सर्व कार्यकर्त्यांसाठी हा एक गुरू मंत्रच असल्याचेही दानवे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT