Marathwada : कुठलाही प्रशासनातील अधिकारी निवृत्त झाला किंवा त्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली तर त्यांच्या भविष्यातील नियोजनाची चर्चा केली जाते. (Sunil Kendrekar Voluntary retirement News) विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीला मंजुरी मिळाल्यानंतर ते काय करणार? याची चर्चा देखील सुरू झाली आहे. केंद्रेकर हे मुळचे शेतकरी असल्यामुळे ते प्रशासकीय सेवेत असतांना सुद्धा आपल्या गावाकडील शेतीकडे कायम लक्ष द्यायचे.
पुढे काय? असे विचारले असता त्यांनी आपल्या विश्वासू मित्रांकडे आपण स्वेच्छानिवृत्तीनंतर शेतीत रमणार असल्याचे सांगितले. (Aurangabad) शेती करायला मला खूप आवडते, त्यामुळे यापुढचा सर्वाधिक काळ हा शेतीमध्ये नवनवे प्रयोग करण्यात घालवणार आहे. या शिवाय अध्यात्मात देखील मी रमणार आहे. (Marathwada) प्रशासकीय सेवेत काम करतांना कायम सर्वसामान्याच्या हिताचा ध्यास घेवून काम केले. त्यामुळे निवृत्तीनंतर देखील शेती, अध्यात्मासोबतच समाज सेवेला माझे प्राधान्य असेल, असे केंद्रकरांनी सांगितले आहे.
पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात दहा हजार रुपयांची मदत करा, अशी शिफारस राज्य सरकारकडे करणारे औरंगाबाद विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दोन-अडीच वर्षापुर्वीच स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे. (Maharashtra) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान, सुनील केंद्रेकर यांना किमान मार्च २०२४ पर्यंत स्वेच्छा निवृत्ती देवू नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रेकर यांनी २४ व २६ मे रोजी शासनाकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यास आज २७ जून २०२३ रोजी मंजुरी देण्यात आली असून ३ जुलै रोजी भारतीय प्रशासन सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेण्यास मान्यता देण्यात आल्याचे पत्र सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी सुनील केंद्रेकर यांना पाठवले आहे. तसेच आपल्या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव (महसुल नोंदणी व मुद्रांक शुल्क) यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवावा असे सुचवले आहे.
सुनील केंद्रकर हे २००२ च्या बॅचचे अधिकारी असून ते मुळचे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याच्या झरी गावचे आहेत. शेतकरी जमीनदार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यामुळे शेतीशी त्यांना चांगलाच लगाव आहे. केंद्रकरांना प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा असल्यामुळे ते या क्षेत्रात आले. औरंगाबाद येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर त्यांनी मराठवाड्यात काम केले.
त्यानंतर कृषी आयुक्त म्हणून त्यांची पुण्याला बदली करण्यात आली होती. त्यानंतर क्रीडा विभागात आणि दोन वर्षांनी ते मराठवाडा विभागीय आयुक्त म्हणून रुजू झाले होते. बीड जिल्ह्यातील चारा छावण्याचा घोटाळा उघड केल्यामुळे ते राज्यभरात चर्चेत आले होते. तेव्हा राजकीय दबावातून त्यांची बदली करण्यात आली होती. एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीनंतर लोक रस्त्यावर उतरणे, बंद पाळणे असे क्वचितच घडते. केंद्रकरांसाठी बीडचे लोक रस्त्यावर उतरले होते, बंदही पाळला होता.
शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी जवळून अनुभवल्या होत्या. शेतकरी आत्महत्या का होतात? त्या रोखण्यासाठी काय उपोययोजना केल्या पाहिजे? यासाठी त्यांनी नुकताच एक सर्वे केला होता. त्यासाठी पाच ते सहा पानांचा अर्ज भरून घेत वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला होता. तसेच शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामाच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये दिले जावेत, अशी शिफारस देखील त्यांनी शासनाकडे केली होती. या शिफारशीमुळेच केंद्रेकरांवर दबाव होता आणि त्यातूनच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा देखील होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.