Raosaheb Danve campaigning In karnataka News
Raosaheb Danve campaigning In karnataka News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve campaigning In karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे स्टार प्रचारक..

सरकारनामा ब्यूरों

Marathwada : आपल्या अस्सल ग्रामीण बोली भाषेत भाषणासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची पक्षाच्या वतीने कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे. (Raosaheb Danve) रावसाहेब दानवे सध्या कर्नाटक दौऱ्यावर असून तिथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

कर्नाटकातील नेलमंगला मतदारसंघातील (Bjp) भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दानवे आजपासून कर्नाटक (Karnataka) दौऱ्यावर गेले आहेत. विविध बैठका तसेच निवडणूक संचलनासंदर्भात ते बुथप्रमुख, पेजप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख, मंडलप्रमुख, तालुका प्रमुख, विविध आघाड्यांचे प्रमुख व अनेक प्रकोष्ट संयोजक तसेच सर्व कार्यकारीणि सदस्यांशी वेगवेगळ्या बैठक घेऊन मार्गदर्शन करत आहेत.

यापुर्वी गुजरात, मेघालय, त्रिपुरा या राज्यांच्या निवडणूकीत देखील दानवे यांच्यावर पक्षाने प्रचार व संघटनात्मक निवडणूक संचलनाची जबाबदारी सोपवली होती. रावसाहेब दानवे उत्तम हिंदी बोलतात त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कर्नाटकातील एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवल्याचे बोलले जाते.

दानवेंनी कर्नाटकात दाखल होताच पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका सुरू केला आहे. गेल्या ४० वर्षापासून राजकारणात असलेले दोनदा आमदार, सलग पाचवेळा खासदार आणि केंद्रात दोनदा राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांचा हा दांडगा राजकीय अनुभव पाहता त्यांना पक्षाने कर्नाटक मोहिमेवर पाठवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT