Beed News : आमदार संदीप क्षीरसागर व त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप वडिल रवींद्र क्षीरसागर (Ravindra Kshirsagar) यांनी केला. याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मंगळवारी (ता. १२) साडे दहा वाजता शहरातील त्यांच्या नगर रोडवरील निवासस्थानी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. (Beed News) तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले, या कारणाने संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) व अर्जुन क्षीरसागर यांनी आपली कॉलर पकडून धक्काबुक्की केली.
माझ्यासह बहिणींना घराबाहेर हाकलून दिल्याचे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. यावरुन संदीप क्षीरसागर व त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गुरले करत आहेत.
आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. परंतु आता क्षीरसागर आणि त्यांच्या वडिलांमध्येच वाद असल्याचे समोर आले आहे. धक्काबुक्की केल्याचा आरोप व थेट पोलिसांत तक्रार दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.