Ravikant Tupkar on CM Shinde  Sarkarnama
मराठवाडा

Ravikant Tupkar on CM Shinde : महाराष्ट्राची रोम सारखी अवस्था; अयोध्या दौऱ्यावरून तुपकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Ravikant Tupkar : ''शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकारच होतं''

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे अयोध्येत जंगी स्वागत करण्यात येत आहे. या अयोध्या दौऱ्याची मोठी चर्चाही सुरू आहे. तर इकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

याच मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. आक्टोबर आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाईची मदत अद्याप मिळाली नाही.

आता पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही आयोध्या दौऱ्यावर आहेत. यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना रोमच्या राजाशी करत या दौऱ्यावर निशाणा साधला आहे.

तुपकर म्हणाले, ''रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता. तशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे. इकडे राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण मुख्यमंत्री तिकडे आपल्या आमदारांबरोबर अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांना अयोध्याचे दर्शन उशिराही घेता आले असते. सध्या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकारच होतं'', अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

''जिवंत माणसं सोडायची आणि देवाच्या दर्शनाला जायचं यापेक्षा पुढच्या महिन्यात अयोध्येला जाता आलं असतं. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आणि आर्थिक मदत द्या, अन्यथा पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या आक्रमक आंदोलनाला सरकारला सामोरे जाव लागेल, असा इशारा तुपकरांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना दिला.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT