Mla In Ayodhya News : आमदार शिरसाटांना प्रभू श्रीराम पावणार का ?

Shivsena : ९ महिने उलटून गेले तरी मंत्रीमंडळ विस्तार काही होईना.
Mla In Ayodhya News
Mla In Ayodhya NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांच्यासोबत पक्षाचे खासदार, आमदार अयोध्येत दाखल झाले आहेत. या सर्वांनी आज प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. शिंदे यांच्या बंडात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाच पैकी चार आमदार सहभागी झाले होते. ठाकरे गटाला हादरा देणारे हे सगळेच जण सध्या अयोध्येत आहेत.

Mla In Ayodhya News
Danve On Diffrent Look News : बंजारा पेहरावात दोन्ही दानवे शोभून दिसले..

प्रभू श्रीरामाच्या साक्षीने धनुष्यबाणाचे पूजन करत शिंदेंची शिवसेना येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत युतीत लढणार आहेत. (Sanjay Shirsat) आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, रोहयो मंत्री संदीपान भुमरे आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वारावर सोबत फोटो काढले. (Shivsena) संजय शिरसाट यांच्यासाठी हा अयोध्या दौरा आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन फलदायी ठरणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

शिंदे यांनी पुकारलेल्या बंडापासून उद्धव ठाकरे व शिवसेनेवर टीका करण्यात संजय शिरसाट आघाडीवर होते. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आपल्या मंत्री पद मिळेल यांची त्यांना खात्री होती, पण एका जिल्ह्यात तीन मंत्री दिल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. पुढील मंत्रीमंडळ विस्तारात तुम्हाल संधी देवू अशी समजूत मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांची काढली होती.

मात्र ९ महिने उलटून गेले तरी मंत्रीमंडळ विस्तार काही होईना. स्वतः शिरसाट यांनी यापुर्वी मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त जाहीर केला होता. परंतु तो देखील टळला, त्यामुळे अजूनही शिरसाटांचे मंत्रीपद वेटींगवर आहे. आता अयोध्या दौरा आणि प्रभू रामाचे दर्शन घेतल्यानंतर तरी शिरसाटांना मंत्रीपदाचा आशिर्वाद मिळतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com