Farmer leader Ravikant Tupkar protest Sarkarnama
मराठवाडा

Ravikant Tupkar Haddapar notice : पत्रकार परिषदेतच हद्दपारीची नोटीस फाडली; रविकांत तुपकरांचा सरकारला थेट इशारा

Ravikant Tupkar warns Maharashtra government : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना हद्दपारीची नोटीस; पत्रकार परिषदेत रविकांत तुपकरांचा निषेध, प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर आरोप करत मोठ्या आंदोलनाचा इशारा.

Pradeep Pendhare

Krantikari Shetkari Sanghatana : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा प्रशासनाने हद्दपारीची नोटीस बजावली आहे. या कारवाईचा निषेध करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रशासनाची नोटीस फाडून टाकली.

यावेळी रविकांत तुपकर यांनी राज्य सरकार (Maharashtra Government) आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री असून त्यांच्या पक्षाच्या आमदारांच्या दबावाखाली प्रशासन शेतकरी कार्यकर्त्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

"गुंड, गुटखा माफिया, रेती माफिया आणि अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई होत नाही; मात्र शेतकऱ्यांसाठी (Farmer) आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या नोटिसा दिल्या जात आहेत. अशी भूमिका आम्ही सहन करणार नाही," असे तुपकर म्हणाले.

हिंगोलीतील भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी प्रशासनावर दबाव टाकून गजानन कावरखे यांच्याविरोधात ही नोटीस बजावल्याचा आरोपही तुपकर यांनी केला. "अशा नोटीशींना आम्ही भीक घालत नाही. अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई प्रलंबित असताना शेतकरी कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात असेल, तर त्याला तीव्र विरोध केला जाईल," असा इशारा त्यांनी दिला.

रविकांत तुपकर यांचा प्रशासनाला इशारा

तुपकर यांनी पुढे सांगितले की, हद्दपारीची नोटीस तातडीने मागे घेण्यात आली नाही, तर हजारो शेतकऱ्यांसह हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल. "संविधानाने अन्यायकारक कारवाईविरोधात लढण्याचा अधिकार दिला आहे. नोटीस फाडून आम्ही चुकीचे काही केलेले नाही. क्रांतिकारी शेतकरी संघटना गजानन कावरखे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभी आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी संघटना संघर्ष तीव्र करणार

दरम्यान, हद्दपारीच्या नोटीसीवरून शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, या प्रकरणाकडे राज्यातील राजकीय आणि शेतकरी वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT