Loan Waiver Beneficiary List : अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीची पहिली यादी वादात; पोर्टल, KYC अन् बँकेतील रक्कम वेगवेगळी असल्याचा दावा

Farmers allege loan amount mismatch in Maharashtra loan waiver list : पोर्टल, KYC आणि बँकेतील नोंदींमध्ये वेगवेगळ्या रकमा दिसत असल्याचा दावा; गजानन कावरखे यांचा आंदोलनाचा इशारा, तर रविकांत तुपकर यांची नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी ₹2 लाख प्रोत्साहन अनुदानाची मागणी
Loan Waiver Beneficiary List
Loan Waiver Beneficiary ListSarkarnama
Published on
Updated on

Ahilyadevi Holkar Loan Waiver List : राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

काही शेतकऱ्यांनी लाभार्थी यादीतील कर्जाच्या रकमेमध्ये तफावत असल्याचा आरोप केला आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लाभार्थी यादीत त्यांच्या नावासमोर दर्शविण्यात आलेली कर्जाची रक्कम प्रत्यक्ष बँकेतील (Bank) थकबाकीपेक्षा कमी आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मराठवाड्यातील क्रांतिकारी शेतकरी (Farmer) संघटनेचे अध्यक्ष गजानन कावरखे यांनी आरोप केला की, पोर्टलवरील माहिती, KYC मधील माहिती आणि बँकेतील नोंदी या तिन्ही ठिकाणी कर्जाच्या रकमा वेगवेगळ्या दिसत आहेत. या तफावतीमुळे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा दावा त्यांनी केला.

Loan Waiver Beneficiary List
Uddhav Thackeray Shiv Sena : 'खाऊसाहेब' म्हणत ठाकरेंनी केली होती आगपाखड; आता खासदार वाकचौरेंचा पलटवार, शिवसेना ठाकरे पक्षाला मोठे खिंडार

जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देताना कावरखे यांनी पोर्टल, KYC आणि बँकेतील नोंदींमधील तफावत तातडीने दूर करण्याची मागणी केली. तसेच, ही समस्या सोडवली नाही तर मुंबईतील मंत्रालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Loan Waiver Beneficiary List
Rahul Gandhi And Mohammad Irfan : CJPच्या आंदोलनातील इरफान कोण? राहुल गांधींनी घेतली भेट

नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 2 लाख अनुदानाची मागणी

दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान अपुरे असल्याचे म्हटले आहे. हे अनुदान वाढवून 2 लाख रुपये करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.

तुपकर यांचा आंदोलनाचा इशारा

राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलताना तुपकर यांनी सांगितले की, सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यभर पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल. तसेच, कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याबरोबरच गैरप्रकार करणाऱ्या संबंधित बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com