Latur BJP Sarkarnama
मराठवाडा

Latur Politics: प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांचा लातूरमध्ये मोठा धमाका; दोन बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

BJP Political News: आगामी महापालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने जिल्ह्यात जोरदार तयारी केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटात शांतता आहे.

Deepak Kulkarni

Latur Political News: प्रहार जनशक्ती पक्षाकडून नगराध्यक्ष झालेले चाकूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक कपिल माकणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाजार समितीचे सभापती निळकंठ मिरकले यांच्यासमवेत असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हे प्रवेश झाल्याची चर्चा आहे.

भाजपच्या (BJP) मुंबई येथील प्रदेश कार्यालयात शुक्रवारी (ता.11) हा पक्षप्रवेश पार पडला. कपिल माकणे हे प्रहार जनशक्ती पक्षात तर सभापती निळकंठ मिरकले हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात होते.

तसेच माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांचे समर्थक होते. माजी नगराध्यक्ष माकणे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यामुळे त्यांना पदमुक्त व्हावे लागले होते. तर बाजार समितीचे सभापती मिरकले यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरु होत्या.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन हे पक्ष प्रवेश झालेले आहेत. पक्षप्रवेशासाठी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, खासदार अजित गोपछडे, आमदार अभिमन्यू पवार, भाजपच्या नेत्या डाॅ.अर्चना पाटील चाकूरकर, प्रदेश संघटनमंत्री संजय कोडगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष राम तिरुके, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अॅड. युवराज पाटील, मंडळ अध्यक्ष सिध्देश्वर पवार यांची उपस्थिती होती.

यावेळी माकणे व मिरकले यांच्यासमवेत विशाल विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव माकणे, नगरसेविका हिरकण लाटे, बालाजी तलवारे, बाळू लाटे, लक्ष्मण फुलारी, अजय नाकाडे, दिलीप गोलावार, हणमंत उस्तुर्गे, दिगंबर मोरे, आत्माराम डाके, मंगेश स्वामी, संदीप महालिंगे आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवातून बाहेर पडत महायुतीने नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक केले. नऊ जागा जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला.या धक्यातून महाविकास आघाडी अजूनही सावरताना दिसत नाही. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने जिल्ह्यात जोरदार तयारी केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटात शांतता आहे.

महायुतीतील (Mahayuti) भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षात मोठ्या घडामोडी घडतांना दिसत आहेत. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आघाडीतील तीनही पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरू आहे. तर ते रोखण्याचे प्रयत्न मात्र आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडून फारसे होताना दिसत नाहीत. महायुतीत मात्र ताकद वाढवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. पक्षप्रवेश सोहळे, बैठकांचा धडाका, मेळावे घेत राजकीय वातावरण तापवले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT