Eknath Shinde, ravindra dhangekar Sarkarnama
मराठवाडा

Congress vs Shivsena : काँग्रेसला 24 तासांत दुसरा धक्का? रवींद्र धंगेकरांनंतर आणखी एक माजी आमदार धनुष्यबाण हाती घेणार

Ravindra Dhangekar joins Shivsena : कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा बसला आहे. या धक्क्यातून काँग्रेस सावरलं नाही तोपर्यंतच काँग्रेसला आता दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Jagdish Patil

Hingoli News, 11 Feb : कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा बसला आहे. या धक्क्यातून काँग्रेस सावरलं नाही तोपर्यंतच काँग्रेसला आता दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून म्हणजे विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिंदेंच्या शिवसेनेचा (Shivsena) कॉन्फिडन्स चांगलाचं वाढल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक पक्षातील लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

नुकतंच पुण्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravidra Dhangekar) यांनी काँग्रेसला अखेरचा रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. धंगेकरांच्या प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद पुण्यात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस कमकुवत झाल्याचं बोललं जात आहे.

धंगेकरांच्या जाण्यामुळे काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला असतानाच आता आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. तो म्हणजे, काँग्रेसचे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर हे देखील पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुण्यानंतर हिंगोलीत देखील काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

भाऊ पाटील गोरेगावकर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोरेगावकर यांनी 3 वेळा हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे. यंदाच्या विधानसभा लढवण्यासाठीही ते इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. तेव्हापासून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

अशातच आता ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवश करणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी त्यांनी यापूर्वीच एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचीही माहिती आहे. तर शिंदेंच्या उपस्थितीत हिंगोलीमध्ये मोठा कार्यक्रम घेऊ ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT