Sharad Pawar On communal riots :  Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar On Communal riots : राज्यात धार्मिक दंगली घडत नाहीत, घडवल्या जातात; पवारांचा रोख कुणाकडे?

Sharad Pawar Stand On communal riots : दंगली घडवण्यामागे काही विचारधारा काम करतायेत..

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास त्यांनी शहरातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत, विविध मुद्द्यावर भाष्य केले. राज्यात सातत्याने घडून येणाऱ्या धार्मित दंगलीबाबतही पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Latest Marathi News)

शरद पवार म्हणाले, "राज्यात सातत्याने दंगली घडून येत आहेत. धार्मितदंगली मर्यादित भागात झाली असेल तर फार चिंतेचा विषय नाही. मात्र असे प्रकार घडत नसून, ते जाणीवपूर्वक घडवले जातात. मी काल एका वाहिनीवर पाहिलं की, कोणीतर गर्दीत कुणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवतो आहे. आता या गोष्टीसाठी इतर ठिकणी दंगल करायचं कारण काय? यासाठी पुण्यात आंदोलन करायची काय गरज आहे, असा सवाल पवारांनी विचारला.

यावेळी पवार यांना धार्मिक अल्पसंख्यांक यांच्यावरील हल्ले, चर्चवरील हल्ले याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर पवार म्हणाले, 'ओडीशामध्ये आणि काही राज्यामध्ये चर्चवर हल्ले झाले. खिश्चन समाज तसा शांतताप्रिय असतो. कुणाची काही चूक असेल तर पोलीस अॅक्शन घ्यावी. त्यासाठी धार्मिक स्थळांवर कशाला हल्ला करावा? हे जे घडतंय, हे सहजासहजी घडत नाही. हे एकटया दुकट्याचं काम नाही. यामागे काही विचारधारा आहेत. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाही, असे शरद पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT