BJP : लोकसभेच्या गमावलेल्या जागा जिंकण्यासाठी BJP चा मेगा प्लॅन ; तीन नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

Loksabha Election 2024 Bjp Mega Plans : १६० मतदार संघात भाजपकडून विशेष अभियान सुरु करण्यात येणार आहे.
Vinod Tawde, Amit Shah and Narendra Modi
Vinod Tawde, Amit Shah and Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Lok sabha Election 2024 Bjp Mega Plans : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप वर्ष बाकी (२०२४) आहे. या निवडणुकीची भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भाजपाने मागील निवडणुकीत पराभव झालेल्या जागांवर जनसंपर्क वाढवण्यासाठी तसेच या जागा काबीज करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे

भाजपने २०१९ मध्ये गमावलेल्या १६० लोकसभा जागा मिळविण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. त्यासाठी भाजपने तीन महासचिवांवर मोठी जबादारी सोपवली आहे. या १६० मतदार संघात भाजपकडून विशेष अभियान सुरु करण्यात येणार आहे.

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४५ ते ५५ रॅलीचं, सभाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी यासाठी या मतदारसंघाचा आढावा घेऊन याठिकाणी रॅलीचे आयोजन केले आहेत.

या रॅलीची जबाबदारी राष्ट्रीय महासचिव सुनील बंसल, विनोद तावडे, तरुण चुघ यांच्यावर सोपवली आहे. या १६० मतदारसंघाची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार मोदींच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

Vinod Tawde, Amit Shah and Narendra Modi
Land for Jobs Scam: 'जमीन द्या ,रेल्वेत नोकरी मिळवा' ; लालू प्रसाद यादव यांनी असा केला गैरव्यवहार

८० मतदार संघातील रॅलीची जबाबदारी नड्डा यांच्यावर आहे, तर अन्य ८० मतदार संघात गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅली, सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

या १६० मतदार संघातील प्रचार, रॅलीच्या आयोजनानंतर दुसऱ्या टप्यात ३८३ जागांसाठी मोदी आणि अन्य बड्या नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

Vinod Tawde, Amit Shah and Narendra Modi
Hasan Mushrif : मुश्रीफांच्या कागल येथील घरावर ED चा पुन्हा छापा : दीड महिन्यातील दुसरी कारवाई

१६० मतदारसंघ कोठे आहेत?

आंध्र प्रदेश, केरळ, ओडिसा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा, बिहार, महाराष्ट्र या प्रमुख राज्यांतील हे १६० मतदारसंघ आहेत. अन्य राज्यातही काही मतदारसंघ आहेत. भाजपाने महाराष्ट्रात अशा १६ मतदारसंघांची निवड केलेली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती या मतदारसंघाचाही समावेश आहे. २०१९ मध्ये झालेलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकूण ४३६ जागा लढवल्या होत्या. यातील ३०३ जागांवर भाजपाचा विजय झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com