Harshvardhan Jadhav News Sarkarnama
मराठवाडा

Harshvardhan Jadhav News : गडकरींच्या विधानाची आठवण करून देत जाधव यांनी टोलनाका बंद पाडला..

सरकारनामा ब्युरो

Marathwada : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात ६० किलोमीटरच्या आत असलेले सर्व टोलनाके बंद करणार, अशी घोषणा केली होती. (Harshvardhan Jadhav News) मात्र त्याची अंमलबजावणी एनएचआयचे अधिकारी, संबंधित टोल कंपनी करत नाही, असा आरोप करत बीआरएसचे समन्वयक माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज कन्नड तालुक्यातील हतनूर येथील टोल नाका बंद पाडला.

टोल नाक्यावर आंदोलन करत वाहतुक अडवल्यामुळे पोलिसांनी जाधव यांच्यासह इतर आंदोलकांना ताब्यात घेतले. (Nitin Gadkari) गडकरी यांनी लोकसभेत टोल नाक्या संदर्भात घोषणा केली असली तरी त्याचा जीआर आमच्याकडे नसल्याचे कारण संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. (Harshvardhan Jadhav) त्यानंतर टोलनाक्यावरील आंदोलनावर ठाम राहिलेल्या जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेत वाहतुक सुरळीत केली.

हतनूर टोलनाका बेकायदेशीरपणे सुरू आहे, असा आरोप करत जाधव यांनी अनेकदा आंदोलने केली. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना भेटून लेखी निवेदने दिली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. (Kannad) हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपुर्वी देखील या टोल नाक्यावर आंदोलन केले होते. त्यानंतर काही काळ हा टोल बंद करण्यात आला होता, मात्र फास्टटॅगची यंत्रणा सुरू ठेवल्यामुळे अनेकांनी आमच्याकडून पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

त्यानंतर जाधव यांनी आज पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेचे अनुपालन करणार की नाही? असा सवाल केला. आम्हाला लेखी द्या, त्याशिवाय इथून हटणार नाही अशी भूमिका घेत टोलनाक्यावर रास्तारोको केला. जाधव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात येताच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना समर्थकांसह ताब्यात घेतले. या गोंधळामुळे हतनूर टोलनाक्यावरील वाहतुक खोळंबली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT