Ambadas Danve On Bawankule News : देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करायला ते कोण होते ?

Shivsena : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसजींचे फोन तुम्ही का घेतले नाहीत ?
Ambadas Danve- Chandrashekar Bawankule News
Ambadas Danve- Chandrashekar Bawankule NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन का उचलत नव्हता ? असा प्रश्न विचारला आहे. (Ambadas Danve On Bawankule News) यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Ambadas Danve- Chandrashekar Bawankule News
AIMIM News : ओवेसी आता समान नागरी कायद्याच्या विरोधात मैदानात उतरणार..

देवेंद्र फडणवीस कोण होते ? ज्यांच्याशी शिवसेनेनी (Shivsena) चर्चा करावी,असा सवाल दानवे यांनी उपस्थीत केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांनी चर्चा केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबतीत चर्चा करायला ते होते कोण ? त्यांचा याच्याशी काय संबंध होता. चंद्रशेखर बावनकुळे आपणही शपथ घेऊन सत्य काय आहे ते सांगा,असे आव्हान दानवे यांनी बावनकुळे यांना ट्विटच्या माध्यमातून दिले.

अमरावती येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला बहुमत मिळाले तर शिवसेना आणि भाजपाचे अडीच - अडीच वर्ष मुख्यमंत्री होतील. केंद्रीय गृहमंत्री व तत्कालीन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन हा शब्द दिला होता. मी माझे आई-वडील व माता पोहरादेवी यांची शपथ घेऊन हे सांगतो आहे, असे म्हटले होते.

यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना हा प्रश्न विचारला होता.आपल्या ट्विटमध्ये बावनकुळे म्हणाले होते की, उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा! पण, सद्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या "शपथा" का घेताहात ? मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसजींचे फोन तुम्ही का घेतले नाहीत ? घ्या, जगदंबेची शपथ! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे "सुत " आहात, तर आता सांगाच तुमचे "सुत" कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता.! उद्धव ठाकरेजी,चर्चा तर होणारच! असे आपल्या ट्विटमध्ये म्हणत टीका केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com