Manoj Jarange Patil, Pankaja Munde, Bajrang Sonwane Sarkarnama
मराठवाडा

Beed Lok Sabha News: बीडमध्ये नवा ट्विस्ट! जरांगे-मुंडे वाद सुरु असतानाच बजरंग सोनवणेंची मोठी मागणी

Jagdish Patil

Beed Lok Sabha Election 2024 News: राज्यातील अनेक लक्षवेधी लढतीमध्ये बीड (Beed) लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये बीड मतदारसंघातील मतदान पार पडलं. या मतदारसंघात सुमारे 70.92 टक्के मतदान झालं. चौथ्या टप्प्यातील हे राज्यातील सर्वाधिक मतदान होतं. हा मतदारसंघ येथील उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच खूप चर्चेचा विषय होता.

शिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मुंडे बहीण-भावाचा संघर्षाची किनारदेखील या मतदारसंघातील महत्वाचा मुद्दा ठरला. मुंडे-जरांगे वाद सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांच्या नव्या मागणीमुळे पुन्हा एकदा बीड मतदारसंघ चर्चेत आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी बीडमधील परळीत काही लोकांनी बुथ कॅप्चर केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच मतदारांना मारहाण झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभुमीवर त्यांनी आता 19 गावात फेरमतदान घेण्याची मोठी मागणी केली आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे.

बीडमध्ये बोगस मतदान केल्याचा आरोप शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला होता. या आरोपानंतर बजरंग सोनवणे यांनी ईव्हीएम (EVM) मशीन ठेवलल्या स्ट्राँग रुमला भेट दिली. तर बीड लोकसभेसाठी (Beed Lok Sabha) बोगस मतदान झाल्याची तक्रार बजरंग सोनवणे यांनी याआधीच केली आहे. मात्र मागच्या दोन-तीन दिवसांमध्ये काही व्हिडिओ समोर आल्यानंतर सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष महबूब शेख (Mehboob Sheikh) यांच्यासह बीड शहराच्या शेजारी असलेल्या पॉलिटेक्निक कॉलेजमधील स्ट्राँग रूमला भेट दिली.

या भेटीनंतर सोनवणे यांनी बीडचे (Beed) पोलिस आणि महसूल प्रशासनावर आरोप केले. या निवडणुकीत प्रशासनाने एकतर्फी काम केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तर परळी विधानसभा मतदारसंघांत अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी एसपी आणि कलेक्टर यांच्याकडे दिल्या. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच बीडमधील परळीत बुथ कॅप्चर करण्यात आले, अनेक पोलिंग एजंन्टसला गायब केलं. मतदारांना मारहाण करण्यात आली असे अनेक आरोप करत सोनवणे यांनी मतदारसंघातील जवळपास 19 गावात फेरमतदान घेण्याची मोठी मागणी केली. त्यामुळे आता या मागणीवर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

बीडमध्ये यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे इथे मराठा विरूद्ध ओबीसी अशी मतांची विभागणी झाल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे आता बीडकर नेमकं कोणाच्या गळ्यात खासदारकीची माळ घालणार हे 4 जूनलाच कळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT