Kalyan Lok Sabha Election : कल्याण-भिवंडीतून तब्बल पावणे दोन लाख मतदारांची नावे गायब !

Kalyan Lok Sabha Election 2024 Voting : मतदारयादीतून नावे कशी गायब होतात, असा प्रश्न उपस्थित करत काही नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचा धिक्कार देखील व्यक्त केला. मतदान करावे यासाठी लाखो रूपयांच्या जाहिराती करता. जनजागृतीसाठी हजारो रूपये खर्च करता आणि मतदान यादीतून नावे गायब करता, हीच का तुमची लोकशाही अशी विचारणा..
Voter List Format
Voter List Format Sarkarnama

Kalyan Election News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा आपला हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रावर गेलेल्या अनेक मतदारांना मतदान न करताच परत फिरावे लागले. कल्याण - भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांना याचा फटका बसला. या दोन्ही मतदारसंघातील पावणे दोन लाख नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

महाराष्ट्रात 48 लोकसभा (Lok Sabha) जागांसाठी पाच टप्प्यात मतदान झाले. सोमवारी अखेरच्या टप्प्यात 13 लोकसभा मतदारसंघाचे मतदान झाले. यामध्ये मुंबईमधील सहा जागांसह नाशिक, धुळे, दिंडोरी, भिवंडी, ठाणे, कल्याण, पालघर लोकसभा मतदारसंघात हे मतदान होत आहे. मतदानासाठी सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागलेले चित्र पहायला मिळत होते. सकाळच्या टप्प्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मतदानासाठी मोठ्या उत्साहाने गेलेल्या नागरिकांची नावेच मतदान यादीतून गायब झाल्याने अनेक नागरिकांचा भ्रमनिरास झाला. कल्याण लोकसभा मतदारसंघातील 80 हजारापेक्षा अधिक तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून एक लाख मतदारांची नावे गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Voter List Format
Sachin Tendulkar News: '...तर शिवराज्याभिषेकाच्या दिवशीच सचिन तेंडुलकरचा त्याच्या घरासमोर पुतळा जाळणार!'; बच्चू कडूंनी दिली वॉर्निंग

मतदान केंद्रावर आलेल्या नागरिकांना मतदान यादीत नाव सापडत नव्हते. गेल्या निवडणुकीला मतदान यादीत नाव होते, मग आता कसे गायब झाले, असा जाब नागरिकांकडून विचारण्यात येत होता. आमच्याकडे वोटिंग कार्ड आहे. मग आम्हाला मतदान करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. मात्र मतदार यादीत नाव नसल्याने तुन्हाला मतदान करता येणार नाही, असे उत्तर नागरिकांना मिळत असल्याने काही केंद्रावर वादाचे किरकोळ प्रकार देखील घडले. आपले नाव शोधण्यासाठी नागरिकांनी अनेकदा मतदार यादी डोळ्याखालून घातली पण नाव नसल्याने त्यांना मतदान न करताच घरी जावे लागले.

निवडणूक (Election) आयोगाच्या मतदारयादीतून नावे कशी गायब होतात, असा प्रश्न उपस्थित करत काही नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचा धिक्कार देखील व्यक्त केला. मतदान करावे यासाठी लाखो रूपयांच्या जाहिराती करता. जनजागृतीसाठी हजारो रूपये खर्च करता आणि मतदान यादीतून नावे गायब करता, हीच का तुमची लोकशाही अशी विचारणा ही उपस्थित नागरिकांच्या वतीने करण्यात आली. प्रत्येक निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये हा घोळ सुरूच असतो. यावर कधी उपाय निघणार असा संतप्त सवालही यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.

Voter List Format
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : ठाकरेंची निवडणूक आयोगावर आरोपांची सरबत्ती, फडणवीसांचं काही मिनिटांतच प्रत्युत्तर; म्हणाले...

मतदारयादीमधून नावे वगळण्यात असल्याने अनेकांनी निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे यावर बोलता येणार नाही, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली. मतदार यादीत नाव असेल तरच नागरिकांना मतदान करता येते. केवळ वोटिंग कार्ड आहे, म्हणून मतदान करू द्या, असे म्हणणे चुकीचे असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Voter List Format
Manoj Jarange Patil News : 'मतदान झाल्यानंतर मी जातीयवादी झालो का?' ; जरांगेंचा 'OBC' नेत्यांना सवाल!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com