Election Commission controversy : देशातील 42 निवृत्त न्यायमूर्ती आणि निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत देशवासियांच्या नावाने खुले पत्र जारी करत, ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. यावरून आता राजकारण पेटू लागले आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विजय वेडट्टीवार यांनी, थेट भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले आहे. हे सर्व मोदी सरकारच्या इशाऱ्यावर हे सर्व करत आहेत.
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनार्थ 42 माजी न्यायमूर्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देशाला लिहिलेल्या खुल्यावर पत्रावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हे सर्व मोदी सरकारच्या इशाऱ्यावर हे सर्व करत आहेत. या न्यायाधीशांना थोडी तरी देशाच्या संविधानाची चिंता असती, अक्षय चिंता असती, तर त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या पापावर पांघरून घालण्याचे काम केले नसते.
मोदी सरकारच्या (Modi Government) मर्जीने कदाचित यांच्या नियुक्त्या झाल्या असतील, असा घणाघात करताना, ज्ञानेश कुमारांचे संविधान विरोधी कृतीचे समर्थन करूनयांना अराजकता माजवत आहात. तुम्ही चोराला साथ का देत आहात? याचा अर्थ असा आहे तुम्ही चोरांच्या बरोबर तुम्ही सुद्धा मिळून आहात, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी पत्र लिहिणाऱ्या त्या 42 अधिकाऱ्यांवर केला.
जालना इथं झालेल्या इंडिया आघाडीच्या मोर्चात काँग्रेस नेते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. विजय वडेट्टीवार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. जालना शहरातील गांधी चमन येथे आंदोलन झाले. सरकार विरोधात घोषणाबाजी करताना, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
विजय वडेट्टीवार यांनी, ज्ञानेश कुमार यांनी देशातील 13 कोटी मतदार कमी केले, हे सर्व मतदार विरोधकांचे होते. या देशातील लोकशाहीवर आणि संविधानावर ज्ञानेश कुमारने दरोडा टाकला. ज्ञानेश कुमार मोदी सरकारचा दलाल म्हणून वागत आहेत. वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी पाच फेऱ्यांमध्ये मागे होते. दोन तास मतमोजणी प्रक्रिया थांबवली आणि त्यांना बढत दाखवली, कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक हरले असते, असा घणाघात केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.