Gyanesh Kumar SIR Controversy : SIR वादात नवा ट्विस्ट; 42 माजी न्यायमूर्तींचं समर्थन, गोपाला गौडांची ज्ञानेश कुमारांना अडचणीत आणणारी मागणी काय?

42 Former Judges Back Election Commission Amid SIR Row : ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर देशभरात राजकीय वाद सुरू असताना SIRच्या कायदेशीरतेवर दोन वेगळे सूर
Gyanesh Kumar SIR
Gyanesh Kumar SIRSarkarnama
Published on: 
Updated on: 

Election Commission of India : विशेष सखोल पुनरावलोकन (SIR)वरून केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संपूर्ण देशात असंतोषाची लाट उसळली असतानाच, त्यांच्या समर्थनार्थ देशातील 42 निवृत्त न्यायमूर्ती आणि निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत देशवासियांच्या नावाने खुले पत्र जारी केले आहे.

याच दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती गोपाला गौडा यांनी वेगळी भूमिका मांडत, सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी वाढतानाच निवडणूक आयोगासह ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) माजी न्यायमूर्ती गोपाला गौडा यांनी, विशेष सखोल पुनरावलोकन (SIR)ला मंजुरी देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याचबरोबर भारताच्या निवडणूक आयोगाने वस्तुस्थितीचे चुकीचे सादरीकरण केले असून, न्यायालयाची दिशाभूल करून हा निर्णय मिळवला, असा खळबळजनक दावा केला आहे.

SIR संदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (suo motu) मागे घ्यावा, तसेच निवडणूक आयोगाकडील (Election Commission) सर्व नोंदी मागवाव्यात, असेही गोपाला गौडा यांनी म्हटले आहे. SIR लागू करण्याचा निर्णय संपूर्ण निवडणूक आयोगाने घेतला होता का? त्याला बहुसंख्य निवडणूक आयुक्तांची सहमती व मंजुरी होती का? हे तपासले पाहिजे, असेही न्यायमूर्ती गौडा यांनी म्हटले आहे.

Gyanesh Kumar SIR
India US excess capacity : अमेरिकेच्या ‘Section 301’च्या छायेत भारताचा मोठा निर्णय; 15 देशांच्या उत्पादन क्षमता उपक्रमात सहभाग

SIR संदर्भातील निर्णयात बेकायदेशीरपणा...

SIR संदर्भातील या निर्णयात बेकायदेशीरपणा आणि घटनाबाह्यतेचे स्वरूप स्पष्टपणे दिसते, अशी भूमिका मांडताना माजी न्यायमूर्ती गौडा यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

Gyanesh Kumar SIR
Hingoli Farmer Suicide : हिंगोलीत 20 दिवसांत 6 शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वडेट्टीवारांनी सरकारला दाखवली 'धोक्याची घंटा'

काँग्रेस तीन दिवसांपासून ज्ञानेश कुमारांविरोधात आक्रमक

ज्ञानेश कुमार यांनी एकतर्फी राबवलेल्या या निर्णयाविरोधात, काँग्रेससह देशभरातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले आहे. दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवले आहे. यातच देशातील 42 निवृत्त न्यायमूर्ती आणि निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्र येत देशवासियांच्या नावाने खुले पत्र जारी करत, ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

गोपाळा गौडा यांनी ज्ञानेश कुमारांची अडचण वाढवली

पण त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती गोपाला गौडा यांनी ज्ञानेश कुमार यांच्या निर्णय न्यायालयाची दिशाभूल करणार असल्याचे सांगून अधिकच अडचणी वाढवल्या आहेत. याचवेळी देशातील 42 निवृत्त न्यायमूर्ती आणि निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्राची देखील हवा काढून घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com