Chhatrapati Sambhajinagar City Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Riot: छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा ; राम मंदिराबाहेरची कमान जाळली..

Riots At Kiradpura in Chhatrapati Sambhajinagar: दोन पोलिसांसह पाच ते सहा जण जखमी झाले

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar Clash News: औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या महिन्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. काल बुधवारी (मध्यरात्री) हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. यावेळी झालेल्या भांडणात समाजकंठकांनी पोलिसांच्या नऊ गाड्या जाळल्या. तर राममंदिरांच्या बाहेरची कमान जाळली.

या हल्ल्यात दोन पोलिसांसह पाच ते सहा जण जखमी झाले असून परिस्थिती नियंत्रणाखाली असून परिसरात पोलिस बंदोबस्त आहे. मध्यरात्री बारा वाजता सुरू झालेला वाद आज (गुरुवारी) पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुरू होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

किराडपुऱ्यात किरकोळ कारणावरुन दोन गटात वाद निर्माण झाला त्याचे पर्यावसान भांडणात झाले, दोन गट एकमेकांना भिडल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार करावा लागला. अश्रूधुराचा वापर पोलिसांनी केला. सध्या येथील पोलिसांच्या नियंत्रणात आहे. येथे तणावपूर्ण शांतता आहे.

राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री बारा वाजण्याच्या सुमारात एस गट राम मंदिराच्या दिशेन जात असताना दुसऱ्या गटाशी त्यांचा वाद झाला. दोन्हा गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

अचानक एका गटाने दगडफेक करण्यास सुरवात केली. त्यानंतर काही क्षणातच पोलिसांसमोरच दोन्ही गट भिडले. काही घरावरही जमावाने दगडफेक केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

परिसरात रस्ते काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. राज्यमंत्री डॉ. भगवान कराड, खासदार इम्जियाज जलील यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

मंत्री अतुल सावे यांनी देखील किराडपुरा भागात धाव घेतली आणि शांततेचे आवाहन केले आहे. इम्तियाज जलील यांनी जनतेला कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT