Rahul Gandhi News: मोठी बातमी : सुरत न्यायालयाच्या निर्णयाला राहुल गांधी देणार आव्हान; काँग्रेसकडून...

Plea Challenging Rahul Gandhi Conviction : दोन दिवसात काँग्रेस न्यायालयात धाव घेणार
Rahul Gandhi News
Rahul Gandhi News Sarkarnama

Plea Challenging Congress Leader Rahul Gandhi Conviction : 'मोदी' आडनावावर वादग्रस्त विधान केल्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली आहे. सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने ही कारवाई केली आहे.

या कारवाईला आव्हान देणारी याचिका काँग्रेसकडून दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात येत्या दोन दिवसात काँग्रेस न्यायालयात धाव घेणार आहे. याबाबतची याचिका तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Rahul Gandhi News
BJP Leaders' Sad Demise : भाजपवर आघात ; तीन महिन्यात 'ताई', दोन 'भाऊ' गमावले..

काँग्रेसमधील विधी सल्लागारांनी या प्रकरणावर अभ्यास करुन ही याचिका तयार केली आहे. ही याचिका दोन दिवसात सुरत सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे.

मोदी सरकारच्या दबावाखाली केलेल्या या कारवाईच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. राजकीय आणि कायदेशीर बाबी लक्षात घेऊन न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात येणार आहे. हा विषय घेऊन काँग्रेस जनतेशी संवाद साधणार आहेत.

Rahul Gandhi News
Congress RoadShow News: निवडणुकीपूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अडचणीत ; Video पाहा, रॅलीत उडवल्या पाचशेच्या नोटा...

काँग्रेसचे नेते मणिकम टागौर म्हणाले, "मोदी सरकारने सुडबुद्धीने राहुल गांधी यांच्यावर ही कारवाई केली आहे, हा सुनियोजित कट आहे. संसदेपासून राहुल गांधी यांना दूर ठेवण्यासाठी मोदींचा हा कट आहे, आम्ही याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत "

राहुल गांधी यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसने देशभर मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या मोहिमेत शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. त्यांनी पत्र लिहून राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे. मोदी सरकारने केलेली ही कारवाई लोकशाहीच्या विरोधात असल्याचे या पत्रात म्हटलं आहे. अशा प्रकारच्या कारवाईमुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्रा. अपूर्वानंद, कवि आणि वैज्ञानिक गौहर रजा, सामाजिक कार्यकर्त्या शबनम हाशमी, निर्माता शरद राज, माजी मंत्री यशवंत सिन्हा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर, इतिहासाचे अभ्यासक इरफान हबीब यांचीही नावे या पत्रात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com