Mla Rohit Pawar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Rohit Pawar News : कुणीही उठावे अन् महापुरुषांबद्दल बोलावे हे सहन करू नका..

Aurangabad : राज्याचा आणि देशाचाही फोकस विकासावर असला पाहिजे, मात्र दुर्दैवाने तो भावनिक राजकारणाकडे नेला जातो.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : देशाला सक्षम करण्यासाठी सर्वच महापुरुषाचे योगदान लाभले आहे. त्यामुळे महापुरुषाचे विचार मॉडर्न पद्धतीने शिक्षणात सामाविष्ट करण्याची गरज आहे. मात्र हे विचार संपवण्यासाठी काहीजणांचे काम सुरु आहे. अशा विचारांपासून दुर राहुन तरुणांनी आपल्या ध्येयावर लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिला.

औरंगाबादेतील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी पवार यांनी मुक्त संवाद साधत विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिले. (Rohit Pawar) रोहित पवार म्हणाले की, तरुणांनी आपला फोकस निश्चीत करुन वाटचाल केली पाहिजे. (Ncp) राज्याचा आणि देशाचाही फोकस विकासावर असला पाहिजे, मात्र दुर्दैवाने तो भावनिक राजकारणाकडे नेला जातो, त्यामुळे विकास कोसोदूर राहतो.

तरुणांनी आपला वापर तर होत नाही ना ही बाब समजून घेतली पाहिजे. गांधी विचारांऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अधिक रुजवण्याची गरज असल्याच्या एका विद्यार्थीनीच्या प्रश्नाच्या उत्तरात पवार यांनी प्रत्येक महापुरुषांचे वेगवेगळे काम आहे. देश उभा करण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिलेले आहे. त्यामुळे महापुरुषांचे विचार सर्वांच्या श्वासात असले पाहिजे असे स्पष्ट केले.

परंतू काहींना राजकारणासाठी हे विचार संपवावे वाटत असले तरीही ते शक्य नाही. उलट कुणीही उठावे आणि महापुरुषांबद्दल काहीही बोलावे हे सहन न करता विरोध केला पाहिजे. अन्यथा नव्या पिढीला चुकीचा इतिहास खरा वाटायला लागेल, त्यामुळेच महापुरुषांचे विचार अधुनिक पद्धतीने शिक्षणात सामाविष्ट करण्याची गरज आहे.

आरक्षण घटनेने दिलेले आहे, त्यामुळे ते संपणार नाही, उलट विद्यार्थ्याच्या प्रोफेशनल शिक्षणासाठी ९० टक्के निधी शासनाने दिला तर प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत किंवा अत्यंत कमी खर्चात शिक्षण मिळेल. यासाठी दिल्ली पॅटर्नचा विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जाती पातीच्या राजकारणात अडकून आपले लक्ष विचलीत होऊ देवू नका, तुम्हाला जे आवडते ते निष्ठेने पुर्ण करा, तुमच्या आवडीच्या विषयात करिअर करा.

आयुष्य तुमच्यासह तुमच्या कुटूंबासाठी अधिक महत्वाचे आहे, त्यामुळे डिप्रेशन येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही पवार यांनी दिला. राजकारणात घराणेशाहीबद्दल विचारलेल्या प्रश्नात ते म्हणाले की एखादी निवडणूक जिंकताही येईल, परंतू कतृत्व सिद्ध केल्याशिवाय लोक निवडून देत नाही. तरुणांनी समाजसेवेच्या माध्यातून सुरुवात करुन राजकारणात पाउल ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT