Marathwada Teacher Constituency Result : विजय तर होणारच, पण तो सोपा हवा होता ; काळेंची खंत..

Vikram Kale : मला हरवण्यासाठी भाजप व इतरांनी पैसे देऊन उमेदवार उभे केले, मात्र माझा विजय निश्चित आहे.
Vikram Kale News, Aurangabad
Vikram Kale News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : तीन टर्म शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे पहिल्या पसंतीतच माझा विजय होणे अपेक्षित होते, पण तसे घडले नाही. आता दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू आहे, त्यात मी कोटा पुर्ण करेल, असा मला विश्वास असल्याची प्रतिक्रिया चौथ्यांदा शिक्षक आमदार होण्याकडे वाटचाल करत असलेल्या विक्रम काळे (Vikram kale) यांनी व्यक्त केला.

Vikram Kale News, Aurangabad
Marathwada Teacher Constituency Result : चर्चेत नसलेल्या विश्वासरावांची अविश्वसनीय कामगिरी, प्रस्थापितांसाठी धोक्यांची घंटा..

माझ्या विरोधात पैसे देवून उमेदवार उभे करण्यात आले होते असा आरोप करतांनाच मतांचे विभाजन संघटना आणि (Bjp)भाजप उमेदवारामध्ये समान झाल्यामुळेच पहिल्या पसंतीत विजय मिळू शकला नसल्याचेही काळे म्हणाले. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे हे चौथ्यांदा निवडून येण्याच्या वाटेवर आहेत. काहीवेळात त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होवू शकते.

तत्पुर्वी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. काळे म्हणाले, आपण पहिल्याच फेरीमध्ये निवडून येणे अपेक्षित होते. पण तसे होतांना दिसत नाहीये. निकाल असा अपेक्षित होता की आपण पहिल्या फेरीमध्येच विजयी होऊ. पहिल्या पसंतीच्या मतामध्ये विजयी होऊ. पण संघटना आणि भाजप दोघांना सारखी मतं मिळाली आहेत. त्यांच्यात फार तफावत वाटत नाही, त्यामुळे थोडीशी खंत वाटतेय.

शेवटी जो जिता वही सिकंदर असतो. मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आता दुसऱ्या पसंतीची मतं मोजावी लागत आहेत. जे काही इतर उमेदवार आहेत त्यामध्ये मला दोन क्रमाकाची मतं मिळतील आणि मी कोटा पूर्ण करेन, असा मला आत्मविश्वास आहे. मला हरवण्यासाठी भाजप व इतरांनी पैसे देऊन उमेदवार उभे केले, मात्र माझा विजय निश्चित आहे. जुनी पेन्शन योजना, शंभर टक्के विना अनुदान शाळांना अनुदान मिळवून देणे हे दोन महत्त्वाचे विषय होते.

त्या मुद्द्यावरुन मतांचं विभाजन झालेलं आहे. मला टार्गेट करण्यासाठी सगळ्यांनी जाणीवपूर्वक उमेदवार उभे केलेले होते. मी यावर लक्ष ठेवून माझ्या परिने काम करत होतो. त्यामुळे ज्यांनी मला मतं दिली त्यांचेही आभार, ज्यांनी दिले नाही त्यांचेही मी आभार मानतो, शेवटी ही लोकशाही असल्याचेही काळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com