Dada Pawar sarkarnama
मराठवाडा

RSSदेवगिरी प्रांतांचे माजी संघचालक दादा पवार यांचे निधन

सरकारनामा ब्युरो

परभणी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांतांचे (RSS Devdagiri) माजी संघचालक अँड. गंगाधर ज्ञानोबा पवार (दादा पवार) (Dada Pawar) यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर वझूरला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अँड पवार हे रात्री नेहमीप्रमाणे फिरायला गेले. त्यावेळी त्यांना अवस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सूरू असतानाच बुधवारी साडे अकराच्या सुमारास त्याचे निधन झाले. अँड. पवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वंयसेवक होते. संघाच्या देवगिरी प्रांताचे संघचालक म्हणून ते कित्येक वर्ष कार्यरत होते. अलीकडेच राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या (एनसीडीसी) सदस्यपदी अँड. पवार यांची केंद्र सरकाद्वारे नेमणूक करण्यात आली होती .

पूर्णा तालुक्यातील वझूर येथील रहिवासी असलेलं अँड. पवार यांची भारत सरकारने केलेली नियुक्ती राष्ट्र सदस्य देशातील ऊस , कापूस , फळे , अन्नधान्य उत्पादक , दूध , मत्स्य उत्पादक व इतर सर्व शेतकऱ्याच्या दृष्टीने ही ऐतिहासिक ठरली. ज्या ठिकाणाहून देशातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्याचे धोरण ठरवले जाते;त्याठिकाणी अँड . पवार यांची नेमणूक करण्यात आली.

जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच एनसीडीसीवर सदस्य म्हणून अँड. पवार यांची नेमणूक झाली. अँड. पवार यांची नाळ समाजातील शेवटच्या घटकांसोबत होती. त्यांनी आयुष्यभर शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे, यासाठी देशातील शेतकऱ्यांनी कच्चामाल बाजारात न विकता त्याच्यावर प्रक्रिया केल्या पाहिजे, अशा प्रकारची धोरणे आयुष्यभर पवार यांनी आपल्या शेतामध्ये राबवली.

गोदावरी काठावर राष्ट्रीय महामार्गाची उभारणी करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी अँड पवार यांच्यामार्गदर्शनाखाली एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. गोदावरी नदी काठाने राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी अँड. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपासून काम सुरु होते. हा विशाखापट्टणम ते नाशिक असा गोदावरी नदीच्या दोन्ही काठाने जाणारा महामार्ग लवकरच मुर्त स्वरुपात यावा या साठी सुनील मानेकर यांना या संबधाने सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाची माहिती दिली व लवकरच नागपुरात या विषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट घडवून आणण्याची विनंती केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT