विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात भाजपचेही व्यापारी कार्ड

अकोला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये (Legislative Council elections) भाजपकडून अखेर सराफा व्यावसायिक वसंत खंडेलवाल (vasant khandelwal) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Gopikishan Bajoria, vasant khandelwal
Gopikishan Bajoria, vasant khandelwalsarkarnama
Published on
Updated on

अकोला : विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वातावरण तापलं आहे. यानिवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

अकोला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये (Legislative Council elections) भाजपकडून अखेर सराफा व्यावसायिक वसंत खंडेलवाल (vasant khandelwal) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती आहे, याबाबतची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

आता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. भाजपनेही व्यापारी कार्डचा वापर करत शिवसेनेला शह देण्यासाठी प्रयत्न केलाय. दरम्यान अकोल्यातील वसंत खंडेलवाल हे संघ परिवारातील असल्याने त्यांचेच नाव फायनल होईल, अशी शक्यता होती.

शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपिकिशन बाजोरिया यांची उमेदवारी कायम असली तरी ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही, असले तरी कॉग्रेसचे स्थानिक नेते बाजोरिया हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, यावर ठाम आहेत. दरम्यान सर्वाधिक मतदार असलेल्या वंचीत बहुजन आघाडीची भूमीका महत्वाची ठरणार आहे.

Gopikishan Bajoria, vasant khandelwal
'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांना अटक; आंदोलनात 'हाय होल्टेज' नाट्य

महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध भाजपचा उमेदवार निश्चित करण्यासाठी मुंबईत तिन्ही जिह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना आव्हान देवू शकणारा त्यांच्या तोडीचा उमेदवार देण्यासाठी चर्चा झाल्यानंतर वसंत खंडेलवाल यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे.

खंडेलवाल यांनी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळीही जय्यत तयारी केली होती. त्यामुळे त्यांना या निवडणुकीसंदर्भात चांगलाच अनुभव असल्याने भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्याबाबत सहमदी झाल्याची माहिती आहे. खंडेलवाल यांचा सोने-चांदी आभूषण विक्रीचा व्यवसाय असून, शिक्षणक्षेत्रातही त्यांनी चांगले काम केले आहे. अकोल्यातील शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संचालक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com