Shivsena news : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती आणि बंडखोरीचे ग्रहण काही केल्या सुटत नाहीये. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून सहा खासदार फुटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर टू’ राबवणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्याची सुरुवात इतक्या लवकर होईल, असे वाटले नव्हते.
गेली १० वर्षे उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून वावरणारे आणि विधान परिषदेत उद्धव ठाकरे आमदार असताना त्यांच्या पाठीमागेच बसणारे आमदार सचिन अहिर आज शिंदेसेनेत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाबद्दल अत्यंत गुप्तता पाळली गेली.
विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी सचिन अहिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासोबत दाखल झाले. या घटनेनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. सचिन अहिर यांच्या अचानक शिंदेसेनेतील प्रवेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
याहूनही मोठा धक्का म्हणजे ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे सहा खासदार फोडण्यातही सचिन अहिर यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असताना सचिन अहिर यांनी खासदार फोडाफोडीमध्ये एकनाथ शिंदे यांचे काम केले. त्याचे बक्षीस म्हणूनच अहिर यांना उपसभापतिपदाची उमेदवारी देण्यात आली आहे, असा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
एवढेच नाही तर 'ऑपरेशन टायगर टू"सुरू झाले असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 12 आमदार लवकरच शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावाही अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
खासदार फोडताना सचिन अहिर हे उद्धव ठाकरेंचे नाही तर एकनाथ शिंदेंचे काम करत होते. त्याचं बक्षीस एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. भविष्यात 12 पेक्षा जास्त आमदार फुटतील, असेही अब्दुल सत्तार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.