Dhananajay Munde on Maharashtra Politics  Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde on Maharashtra Politics : समयने कुछ वक्त... ;परळीकरांशी बोलताना धनंजय मुंडेंचे सूचक विधान

Beed Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात काय झालं, काय नाही, काय सुरु आहे, हे आपण सर्वांनी पाहिलं

सरकारनामा ब्यूरो

Parli Politics : "समयने कुछ वक्त मेरा साथ ना दिया...." असं म्हणत नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या विरोधकांवर निशाणा साधला आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे गुरुवारी (१३ जुलै) पहिल्यांदाच परळीत आले होते.यावेळी सात क्विंटलचा फुलांच्या हाराने धनंजय मुंडे यांचे स्वागत करण्यात आले.हजारो लोक मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत हजर होते. त्यांनी परळीकरांशी संवाद साधला.

धनंजय मुंडे म्हणाले, यापूर्वी मी ज्या पक्षात होतो तेव्हा मला विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली.मी पहिल्यांदा विधीमंडळात गेलो ते केवळ अजितदादा यांच्यामुळे. मी मंत्री झाल्याने आता तुमच्याही अपेक्षा वाढल्या.परत एकदा सभा घ्यायची आहे.संपूर्ण मंत्रिमंडळाला परळीत आणायचं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांना परळीत आणायचं आहे. आपल्या मातीचे नाव उभ्या देशात गाजवल्या गप्प बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात काय झालं, काय नाही, काय सुरु आहे, हे आपण सर्वांनी पाहिलं. याचं तुम्हाला काही सोयरसुतक वाटते की नाही? सत्ता येते आणि जाते. पण सत्ता येताना आणि जाताना काय फरक असतो ते मी पाहिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे म्हणाले, " गेल्यावेळी जेव्हा मंत्री झालो तेव्हा मिरवणूकीतच इतका वेळ गेला की भाषण करत आले नाही. पण यावेळी माझ्या आयुष्यात इतका असा प्रतिसाद मिळाला नाही इतका मोठा प्रतिसाद आज मिळाला आहे. माझ्या संकटकाळात जे लोक सोबत आणि पाठीशी होते त्या सर्वासमोर नतमस्तक होतो.मी दुसऱ्यांदा मंत्री झालो. त्यावर काय बोलावं आणि कुणाकुणाचे आभार मानावेत झाल्यावर काय बोलावे? कुणाकुणाचे आभार मानावेत हेच कळत नाही. मी इथल्या प्रत्येक व्यक्तीला एक शब्द दिला होता. तो पूर्ण केल्याचा आज मला अभिमान आहे. तो म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काही करायची वेळ येईल तेव्हा त परळीच्या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही, असं मी म्हणालो होतो. तो शब्द पूर्ण केला आहे, असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT