Ravikant Tupkar Sarkarnama Exclusive : 'मी सदाभाऊंच्या वाटेने जाणार नाही' : रविकांत तुपकर

Ravikant Tupkar - Shetkari Sanghatna : माझा जीव शेतकऱ्यांमध्ये आहे.
Ravikant Tupkar Sarkarnama Exclusive :
Ravikant Tupkar Sarkarnama Exclusive :Sarkarnama
Published on
Updated on

Ravikant Tupkar Sarkarnama Exclusive : मला सगळ्या पक्षाचे नेते भेटतात. तुमच्यासारखा माणून पक्षात आला तर आमदार व्हाल खासदार व्हाल, पण चळवळ सोडता येत नाही, ही आमची कमजोरी आहे. अशी प्रतिक्रीया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे. 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

रविकांत तुपकरांची स्वतंत्र आंदोलनाची भूमिका आहे जी सदाभाऊंच्या दिशेने जाताना दिसत नाहीत , सदाभाऊ ज्या पद्धतीने बाहेर पडले त्याच मार्गाने रविकांत तुपकरांचाही प्रवास सुरु झालायं, अशी परिस्थिती आहे का? यावर बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, अशी परिस्थिती नाही. मी सदाभाऊंच्या वाटेने जाणार नाही. आज मी कोणत्याही सत्ताधारी पक्षात गेलो तरी मला कोणतीही चांगली पदे मिळू शकतात, हे सांगायची गरज नाही. तसं काम आम्ही गेल्या वीस वर्षात चळवळीच्या माध्यमातून केलं आहे. चळवळीतून आमचा जीव निघत नाही, हा आमचा प्रॉब्लेम आहे.

Ravikant Tupkar Sarkarnama Exclusive :
Bachchu Kadu On Cabinet Expansion : '' मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांच्या बायकांचाही आता...'; आमदार कडूंचा मिश्किल टोला

रविकांत तुपकर म्हणाले, 'मला सगळ्या पक्षाचे नेते भेटतात. तुमच्यासारखा माणून पक्षात आला तर आमदार व्हाल खासदार व्हाल, पण चळवळ सोडता येत नाही, ही आमची कमजोरी आहे. चळवळ आमचा वीक पॉइंट आहे. त्यामुळे हा प्रवास सुरु राहणार आहे. मला जर वेगळ्या दिशेने प्रवास करायचा असता तर मी लाल दिव्याला लाथ मारुन शेतकऱ्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला नसता. (Swabhimani Shetkari Sanghatna)

'वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष असताना, मला मंत्रीपदाचा दर्जा होता. मलबार हिलला बंगला होता. पोलीस संरक्षणही होतं, सगळं होतं. पण राजीनामा देऊन एसटी गावाकडे जाणारा माणूस आहे मी. कारण माझा जीव शेतकऱ्यांमध्ये आहे.' अशी भावनाही तुपकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Ravikant Tupkar Sarkarnama Exclusive :
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचाच बोलबाला; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचे पानिपत

तुपकर म्हणाले, 'सोयाबीन कापसाचंही भलं झालं पाहिजे, विदर्भवीर जाबुंवतराव धोते यांच्यानंतर विदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन कधीच उभ राहिलं नाही, सोयाबीन कापसासाठी व्यापक आंदोलन उभ राहिलं पाहिजे. मी सोयाबीन -कापूस पट्ट्यात जन्म घेतलाय, त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन कापसासाठी एक व्यापक आंदोलन उभ राहिलं पाहिजे. या हेतूने मी मराठवाडा, विदर्भ, खान्देश या भागात लक्ष केंद्रीत केलं आहे. मी नुकताच सोलापूरचा दौरा करुन आलो. पंढरपूर, माळशिरस कर्माळा, या ठिकाणी मी दौरे करुन चळवळीतून राजकारणा आलेली तरुण पोर आहेत त्यांना ताकद देण्याचं काम मी करत आहे.'

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com