Sambhaji Nilangekar News :
Sambhaji Nilangekar News : Sarkarnama
मराठवाडा

Sambhaji Nilangekar News : शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा अन्यथा... ; निलंगेकरांचा विमा कंपन्यांना इशारा!

Chetan Zadpe

Marathwada News : खरीप हंगामातील शेतपिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन, त्याबाबत अहवाल सादर करावा आणि पीकविमा कंपन्यांनी संभाव्य नुकसान आणि शेतमालाची हानी याच्या 25 टक्के अॅडव्हान्स रक्कम तातडीने देण्याचे आदेश देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढले होते. मात्र, या आदेशानुसार पीकविमा अद्यापही शेतकऱ्यांना दिला गेला नसल्याचे सांगत, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आता विमा कंपन्यांना निशाण्यावर घेतले आहे. (Latest Marathi News)

संभाजी पाटील निलंगेकर यांनी पीकविमा कंपन्यांना आता निशाण्यावर घेतले आहे. त्यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. कंपन्यांकडून 32 मंडळांसाठी 194, तर 28 मंडळांसाठी 205 कोटी रुपये कंपन्यांनी जमा करावेत, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा इशारा त्यांनी दिला.

यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते, खराब हवामानामुळे शेतीचा खरीप हंगामातील पिके वाया गेली. मात्र, खरिपासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला असल्यामुळे संबंधित नुकसानीचं अहवाल, प्रशासनाकडे सुपूर्त झाला होता. यानुसार शेतीच्या नुकसानीच्या 25 टक्के रक्कम तातडीने देण्याचे आदेश मिळूनही, पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्याचे टाळले आहे.

याच मुद्द्यावरून आता माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी वेळोवेळी पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला. तसेच कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा, अन्यथा कंपन्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा इशाराच त्यांनी दिला. याबाबत सरकारकडे वारंवार पीकविमा कंपन्यांच्या तक्रारी दाखल करत दोषी कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची आग्रही मागणी निलंगेकर यांनी केली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT