Eknath Shinde News: खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या महत्वाच्या सूचना; शेतकऱ्यांना...

Kharif Season Review Meeting: खरीप हंगाम आढावा बैठकीत शेतकऱ्यांबाबत महत्वाचा निर्णय
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ आला असून त्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली आहे.

शेतकऱ्यांना खते आणि बियाणे उपलब्ध होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

Eknath Shinde
Suspension Of Ashish Deshmukh: मोठी बातमी! आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी; काय आहे प्रकरण ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "शेतकऱ्यांचे खरीप हंगाम आता सुरू होईल. त्यासाठी शेतकऱ्यांना काही कमी पडू दिले जाणार नाही. खते आणि बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. शेतकऱ्यांना काहीही कमी पडू न देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत", असं शिंदेंनी सांगितलं.

Eknath Shinde
Suresh Dube Murder Case: महाराष्ट्रातील शेवटच्या टाडा केसमध्ये भाई ठाकूरसह तिघे निर्दोष; बिल्डर दुबे खून प्रकरण!

"आज राज्यस्तरीय खरीप हंगामाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. विमा कंपन्याकडून अडवणूक होणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही", असंही यावेळी शिंदे म्हणाले.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com