Shivsena Marathwada News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने कंबर कसली आहे. संभाव्य उमेदवारांवर त्यांच्या मतदारसंघासह एखाद्या दुसऱ्या मतदारसंघाची जबाबदारी देत त्यांना संघटनात्मक बांधणीसाठी पुरेसा वेळ मिळावा, याची काळजी घेण्यात आली आहे. (Sambhajinagar Constituency News) छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरच सोपवण्यात आली आहे.
या शिवाय शेजारच्या जालना लोकसभा मतदारसंघातही ते काम करणार आहेत. जालना मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे असल्याने तिथे (Shivsena) शिवसेना ठाकरे गट आघाडीच्या उमेदवारासाठी आपली ताकद वापरणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे.
संघटनात्मक जबाबदारी देताना आवर्जून खैरे यांच्याकडे संभाजीनगरची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे खैरे यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Marathwada) पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील संघटनात्मक बांधणीवर भर देण्यासाठी ठाकरे गटाकडून विभागीय नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दहा नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे. 2024 च्या लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच्या दृष्टीने या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.
मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी चंद्रकांत खैरे यांच्यावर तर धाराशीव, लातूर, बीडसाठी सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आमदार रवींद्र वायकर यांच्यावर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या तीन लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी असेल.
काही दिवसांपूर्वी ठाकरेंनी रायगडमधून अनंत गीते यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला होता. त्यांच्यावरही कोकणातील रायगड आणि मावळ या दोन मतदारसंघांचीच जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे गीते आणि मराठवाड्यातील संभाजीनगरातून खैरे यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.