Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News. Sarkarnama
मराठवाडा

Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 'अबकी बार सव्वाशेपार' प्रभाग रचनेनंतर नगरसेवकांची संख्या वाढणार!

Sambhajinagar Municipal Corporation will see an increase in the number of councilors for the first time : गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका चार महिन्यांत घ्या, असे आदेश दिले आहेत. तसेच एक महिन्यात अधिसूचना काढण्याचे निर्देशही दिले आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambahjinagar : महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यानंतर आता निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. त्यानूसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेसह प्रमुख शहराच्या महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच प्रभागानूसार होणार आहे. चार प्रभागांचा एक वार्ड अशी साधरण रचना होईल, त्यानूसार नगरसेवकांची संख्याही सव्वाशेपार जाण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation) चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार रचना करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. 2022 च्या लोकसंख्येच्या आधारावर ही प्रभाग रचना करण्यात येणार आहे. त्यानुसार नगरसेवकांची संख्या 126 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच प्रभागांची संख्या 29 होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका चार महिन्यांत घ्या, असे आदेश दिले आहेत. (Chhatrapati Sambhajinagar) एक महिन्यात निवडणुकीबद्दलची अधिसूचना काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाला दिले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंगळवारी आदेश काढले आहेत. त्यानूसार चार वॉर्डांचा एक प्रभाग याप्रमाणे प्रभागांची रचना करण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रभाग रचना तयार करून ती राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्याचे अधिकार नगर विकास विभागाने महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत. प्रभाग रचना करताना आठ सप्टेंबर 2022 नुसार सदस्यसंख्या विचारात घ्यावी, असे निर्देश आहेत. यानुसार प्रभाग रचना झाल्यास छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 29 प्रभाग होतील असे मानले जात आहे. लगतच्या जनगणनेनुसार म्हणजे 2021 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 आहे.

या लोकसंख्येनुसार 115 वॉर्डांची रचना करण्यात आली आहे. आता चार वॉर्डांचा एक प्रभाग केल्यास 28 प्रभाग चार वॉर्डांचे होणार असून एक प्रभाग तीन वॉर्डांचा होईल. असे एकूण 29 प्रभाग तयार केले जातील, असे बोलले जाते. निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिल्यावर महापालिकेचे आयुक्त ही प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर सूचना-हरकती मागवतील. राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यासमोर हरकती सूचनांची सुनावणी होईल, त्यानंतर अंतिम प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून तो निवडणूक आयोगाच्या मान्यतेला पाठवला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT