Municipal Commissioner G. Shrikant : आता फाईल गायब होणार नाही! मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा 'ई ऑफिस'वर भर..

Chhatrapati Sambhajinagar Municipal Commissioner assures that missing files will be a thing of the past as the administration pushes for full adoption of e-office systems. : फाईल्स गायब होणे, जळणे, सापडत नाही किंवा कुणी तरी घेऊन गेले हे प्रकार नेहमीच घडत असतात. माझ्या सोळा वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये मी चार महापालिकांमध्ये काम केले. त्यात हा अनुभव आला.
Municipal commissioner Chhatrapati Sambahjinagar G. Shrikant News
Municipal commissioner Chhatrapati Sambahjinagar G. Shrikant NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : कुठल्याही सरकारी कार्यालयातील फाईलींचा प्रवास हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर या फाईलींवर किती कमी वेळात कारवाई होते, यावरच नागरिकांचे प्रश्न, शहराचा विकास अवलंबून असतो. अनेकदा महापालिकांमधील फाईल गायब होणे, त्या कोणीतरी घेऊन जाणे, जळाल्या असे सांगणे किंवा सापडत नाही अशी उत्तरे अनेकदा ऐकायला मिळतात.

छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhajinagar) महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी यावर 'ई ऑफिस'चा तोडगा काढला आहे. सगळ्या फाईल्स आॅनलाईनवर आणत एका कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत त्यावर कारवाईसाठी हा प्रयोग राबवला जात आहे. पेपरलेस ऑफिस करण्याच्या दृष्टाने टाकलेले हे पाऊल भविष्यात कामाला वेग देणारे ठरेल असा विश्वास आयुक्त जी. श्रीकांत यांनी सकाळ माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

सरकारी कार्यालयांमध्ये धुळखात पडलेले फाईलींचे ढिगारे, त्यात आपली फाईल शोधण्यासाठी खेट्या मारणारे नागरीक हे चित्र आता बदलले आहे. हा बदल कसा घडवला? अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानसिकता कशी बदलली? यावर आयुक्त भरभरून बोलले. महापालिका (Municipal Corporation) कार्यालयातील फाईल्स गायब होणे, जळणे, सापडत नाही किंवा कुणी तरी घेऊन गेले हे प्रकार नेहमीच घडत असतात. माझ्या सोळा वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये मी चार महापालिकांमध्ये काम केले. त्यात हा अनुभव नेहमीच आला.

Municipal commissioner Chhatrapati Sambahjinagar G. Shrikant News
Municipal Commissioner G. Shrikant : छत्रपती संभाजीनगर आता थांबणार नाही! मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा निर्धार

त्यामुळे फाईलींचा हा गहाळ होण्याचा प्रकार थांबवण्यासाठी 'ई ऑफिस'वर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांच्या कार्यक्रमात देखील यावरच अधिक जोर दिला आहे. त्या अंतर्गत आम्ही महापालिकेतील सगळ्या फायलींचे डिजिटलायजेशन करून सगळा कारभार हा ई ऑफिसवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व फायली आॅनलाईन घेतल्यामुळे कोणती फाईल कुठल्या टेबलवर, कोणत्या अधिकारी कर्मचाऱ्याकडे आहे, हे शोधणे सोपे झाले आहे.

Municipal commissioner Chhatrapati Sambahjinagar G. Shrikant News
Imtiaz Jaleel On Chhatrapati Sambhajinagar : 'छत्रपती संभाजीनगर' नावाला विरोध का? इम्तियाज जलीलांनी थेट पुणे, कोल्हापूर, नागपूरच्या नावात बदल सुचवला

तंत्रज्ञानाचा वापर करत महापालिकेत विविध कामांसाठी आलेल्या फायलींवर तातडीने कारवाई करणे या ई ऑफिसमुळे शक्य होणार आहे. त्यामुळे आता फाईल गायब झाली, सापडत नाही, जळाली अशी उत्तरे ऐकावी लागणार नाही, असेही आयुक्त जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले. शहराच्या सर्वांगीण विकासाची ब्लू प्रिंटच यावेळी त्यांनी मांडली. शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर आता कसे थांबणार नाही? हे आयुक्तांनी सविस्तरपणे सांगीतले. शहराचा विकास साधतांना प्रशासक म्हणून माझी असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com