Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation News Sarkarnama
मराठवाडा

Development Plan News : संभाजीनगरने बाजी मारली ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शहरांचा `डीपी प्लान` रखडला..

माधव इतबारे

Aurangabad Political : विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्यातील अनेक शहरांत सुरू आहे. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे, उपमुख्यमत्री फडणवीस यांच्या नागपूर आणि अजित पवारांच्या पिंपरी चिंचवडमध्येही. (Municipal Corporation News) पण या शहरांचे डीपी प्लान रखडलेले असतांना छत्रपती संभाजीनगर शहराच्या डीपी युनिटने केवळ दोन वर्षांत जुन्या व विस्तारित शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार करून बाजी मारली आहे.

शिंदे यांच्या ठाणे, फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) नागपूर व अजित पवार यांच्याशी संबंधित पिंपरी-चिंचवड या शहरांचा विकास आराखडा चार वर्षे उलटली तरी अंतिम झालेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने चार ऑगस्ट २०२१ ला उपसंचालक डॉ. मो. र. खान यांच्या नेतृत्वाखाली डीपी युनिटची स्थापना केली होती.

या युनिटने अवघ्या दोन वर्षांत विद्यमान जमीन वापर नकाशा (ईएलयू) आणि प्रस्तावित जमीन वापर नकाशा (पीएलयू) पूर्ण केला आहे. (Marathwada) दोन वर्षांत शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम यापूर्वी कुठेही झालेले नाही. आगामी २० वर्षांसाठी विकास आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून पाच वर्षांचा अवधी दिला जातो. सध्या राज्यातील १४ शहरांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

त्यात ठाणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, अकोला, भिवंडी, कल्याण-डोंबिवली यासह इतर शहरांचा समावेश आहे. याठिकाणी डीपी युनिट स्थापन होऊन चार वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र अद्याप या शहरांचा विकास आराखडा अंतिम झालेला नाही. काही ठिकाणी ईएलयू तयार झाला आहे, तर काही ठिकाणी पीएलयूचे काम सुरू आहेत.

शहर डीपी युनिट स्थापन क्षेत्रफळ

ठाणे डिसेंबर- २०२० १२८ चौरस किलोमीटर

नागपूर मे-२०१९ २२७ चौरस किलोमीटर

पिंपरी-चिंचवड जून-२०१८ ०७७ चौरस किलोमीटर

कोल्हापूर ऑगस्ट-२०१९ ०६६ चौरस किलोमीटर

अकोला जुलै-२०१९ १०५ चौरस किलोमीटर

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT