Nanded Political News : पंकजा मुंडे आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यात बहिण-भावाचे नाते आहे. आज योगायोगाने राखी पौर्णिमा होती आणि दोघेही माहूरला रेणुकामातेच्या दर्शनाला आले होते. त्यामुळे पंकजा यांनी माहूर गडावरच जानकरांना राखी बांधली. यावेळी या बहिण-भावात हास्यविनोदही रंगला.
राखी बांधल्यानंतर जानकरांनी ओवळणी म्हणून पंकजा यांना देण्यासाठी खिशातून पैसे काढले. यावर (Pankaja Munde) पंकजा म्हणाल्या, मला ब्लॅंक चेक द्या, रासपचा. आता आपल्याला हेलिकाॅप्टरने जायचे आहे, बघा मी किती भाग्यवान आहे. यावर जानकर (Mahadev Jankar) यांनी तुमच्या मुळेच चाललंय माझं, अस म्हणत कृतज्ञता व्यक्त केली. बहिण-भावामधील या संवादावर उपस्थितांनीही दाद दिली.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बुधवारी माहूर येथे रेणुकामातेचे दर्शन घेतले. देवीच दर्शन घेत पंकजा यांनी आपल्या `शिवशक्ती`, परिक्रमेला सुरुवात केली. (BJP) दोन महिने राजकारणापासून लांब राहिलेल्या पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय होत आहेत. तत्पुर्वी राज्यातील दहा जिल्ह्यातून `शिवशक्ती` यात्रेच्या माध्यमातून त्या समर्थकांशी संवाद साधणार आहेत.
नांदेडहून माहूरला येतांना पकंजा यांचे ठिकठिकाणी जल्लोशात स्वागत झाले. या स्वागताने भारावलेल्या पंकजा मुंडे यांनी ३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शिवशक्ती यात्रेत काय होईल हे मला सांगता येत नाही. मी लोकांना कसे रोखू असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली. आज नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी श्रीक्षेत्र माहूरगडावर रेणुका देवीचे दर्शन घेतले. श्रावणात राज्यातील सर्व शक्तीपीठे आणि सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याच्या उद्देशाने शिवशक्ती परिक्रमेची सुरूवात त्यांनी रेणुकादेवीचे दर्शन घेत केली.
रेणुका माता माझे प्रेरणा, आदर, ऊर्जास्थान असल्याचे त्यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माधव जानकर, राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे सदस्य प्रवीण घुगे, भाजप प्रदेश सचिव देविदास राठोड, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर आदी उपस्थित होते. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अकरा दिवस राज्यातील दहापेक्षा अधिक जिल्ह्यांचा दौरा पंकजा मुंडे सुरू करणार आहेत. या दौऱ्याला `शिवशक्ती` असे नाव देण्यात आले आहे. हा दौरा फक्त देवदर्शनापुरता मर्यादित असेल असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. माहूर शहरात पंकजा मुंडे दाखल होताच कार्यकर्त्यांनी जेसीबीतून त्यांच्यावर फुलांची उधळण केली.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.