Sugar Industrialist Join Bjp News, Jalna
Sugar Industrialist Join Bjp News, Jalna Sarkarnama
मराठवाडा

Jalna News: मोठा साखर कारखानदार भाजपच्या गळाला, राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न?

सरकारनामा ब्युरो

Ghadge Join Bjp : जालना आणि परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीला शह देवू शकेल असा मोठा साखर कारखानदार भाजपच्या गळाला लागला आहे. Nagpur नागपूर अधिवेशना दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थीतीत हा प्रवेश झाला. समृद्धी शुगरचे चेअरमन सतिश घाडगे पाटील असे त्यांचे नाव आहे. साखर कारखानदारी क्षेत्रासह राजकीय आखाड्यात राष्ट्रवादीला शह देण्याचा यातून भाजपने प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.

परभणी लोकसभा आणि जालन्यातील घनसावंगी विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने घाडगे यांचा भाजप प्रवेश महत्वाचा मानला जातो. (Bjp) विशेष म्हणजे घाडगे यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे माजीमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील केले होते. पण भाजपने ते हाणून पाडत घाडगेंच्या हाती कमळ देत पुढची खेळी केली आहे. (Jalna)

घनसावंगी विधासभा किंवा परभणी लोकसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी यातून भाजपने सुरू केल्याचे दिसते. घाडगे यांच्या भाजप प्रवेशामुळे घनसांवगीत माजी आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांना आव्हान दिले जाणार आहे. तर परभणी लोकसभा क्षेत्रात दोन साखर कारखाने असलेल्या घाडगेंच्या पक्ष प्रवेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला भाजपकडून आव्हान दिले जाऊ शकते.

घाडगे यांनी देखील आपली ताकद नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिली होती. समृद्धी ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच घाडगे यांनी घनसावंगी विधानसभा मतदार संघात २१ पैकी १३ ठिकाणी सरपंचपद पटकावले. आता घाडगे यांच्या भाजप प्रवेशाने नेमका कुणाचा गेम होणार? हे आगामी काळातल्या निवडणुकीतूनच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT