Santosh Bangar in Winter Session : बांगरांनी कैलास पाटलांना फोटोसाठी ओढले, ते म्हणाले मला जाऊ द्या..

Nagpur : कैलास पाटील फोटोसाठी तयार होईनात. तेव्हा बांगर यांनी हात ओढत फोटो काढायला काय हरकत आहे? असे म्हणत आग्रह केला.
Mla Bangar-Patil News, Aurangabad
Mla Bangar-Patil News, AurangabadSarkarnama

Nagpur News : नागपूरचे हिवाळी अधिवेशन अजून म्हणावे तसे तापलेले नाही. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, भुखंड वाटपावरून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, व्हाईटबुकमधील कामांना स्थगिती या विषयावरून सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये खटके उडतांना दिसत आहेत. पण खऱ्या अर्थाने अधिवेशनात कामकाजाला पुढच्या आठवड्यात सुरूवात होईल असे बोलले जाते. Winter Session सध्या विधानभवनाच्या पायऱ्यावर सत्ताधारी आणि विरोधक असे दोघेही आंदोलन करतांना दिसत असल्यामुळे जनतेची मात्र करमणूक होतांना दिसते आहे. एकीकडे आंदोलन तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटाच्या आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी जवळीक वाढवू पाहत आहेत.

Mla Bangar-Patil News, Aurangabad
Grampanchayat Election : `भारत जोडो` नंतरही काॅंग्रेसची पिछेहाट ; राष्ट्रवादीची मुसंडी..

विधानभवनाच्या परिसरात हे चित्र पहायला मिळाले. राज्यातील सत्तांतरापुर्वी झालेला मुंबई, सुरत-गुवाहाटी-गोवा या प्रवासाची चर्चा अजूनही केली जाते. या प्रवासा दरम्यान, उस्मानाबाद-कळंबचे (Marathwada) शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील हे अर्ध्या रस्त्यातून पळून आले होते. शिंदे गटाच्या तावडीतून आपण कशी सुटका करून घेतली. (Santosh Bangar) दोन किलोमीटर पायी चालत ट्रकमधून पुन्हा मुंबई कशी गाठली याचा अनुभव कैलास पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितला होता.

त्यामुळे ते राज्यभरात चर्चेत आले होते. तर हे कैलास पाटील विधानभवन परिसरात असतांना शिंदे गटाच्या संतोष बांगर यांनी त्यांना पाहिले आणि कैलासराव या इकडे असे म्हणत साद घातली. अर्थात ते शिंदे गटात या म्हणून नाही, तर प्रसार माध्यमांना दोघांचा एकत्रित फोटो घेता यावा म्हणून. पण कैलास पाटील काही फोटोसाठी तयार होईनात. तेव्हा बांगर यांनी चक्क त्यांच्या हात ओढत फोटो काढायला काय हरकत आहे? असे म्हणत आग्रह केला.

इच्छा नसतांना, चेहऱ्यावर खोटे हसू आणत कैलास पाटील बांगर आणि संजय गायकवाड यांच्या जवळ अगदी काही क्षणासाठी उभे राहिले. तेवढ्यात तिथे ठाकरे गटाचे आणखी एक आमदार कन्नडचे उदयसिंह राजपूत हे देखील आले, बांगर-गायकवाड जोडीने त्यांनाही सोबत फोटोसाठी आग्रह केला.

कैलास पाटील आधीच तिथे उभे असल्यामुळे राजपूत यांनी फारसे आढेवेढे न घेता सोबत फोटो काढला. हे पाहून इतर माध्यमांचे छायाचित्रकार तिकडे येवू लागले हे पाहून मात्र राजपूत-पाटील यांनी तिथून काढता पाय घेतला. या काही क्षणांच्या चित्राची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com