Sandip Kshirsagar target Sunetra Pawar PA  sarkarnama
मराठवाडा

Sandip kshirsagar : 'आता अति झाले', सुनेत्रा पवारांच्या 'पीए'वर संदीप क्षीरसागर संतापले; जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार!

Sunetra Pawar PA : आमदार संदिप क्षीरसागर यांनी ध्वजारोहन कार्यक्रमातून स्थानिक आमदार आणि नेत्यांना डावलले जात असल्याचा संतपा व्यक्त केला. तसेच सुनेत्रा पवार यांच्या पीएला टार्गेट केले.

Jagdish Pansare

Beed News: बीडमध्ये पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. मात्र, या कार्यक्रमात स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांना डावल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांना जाब न विचारणाऱ्या पालकमंत्र्यांबद्दलही या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना सन्मानाने न बोलावणे आणि राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) डावलणे आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी पाठीशी घालणे, हा प्रकार गंभीर आहे, असे संदीप क्षिरसागर म्हणाले.

संदीप क्षीरसागर यांनी निधी आणि निमंत्रण न मिळण्याच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पीएंना टार्गेट केले. ते म्हणाले, पीए झरे आणि देशमुख यांच्या सांगण्यावरूनच येथील संपूर्ण कारभार चालवला जातोय. आम्ही शांत बसणार नाही. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू.

संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आमदार उषा दराडे, सय्यद सलीम व स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक कार्यक्रमातून डावलले जात असल्याच्या विषयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकप्रतिनिधींना कार्यक्रमांचे रीतसर निमंत्रण देणे आणि मानसन्मान देणे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जर आमदारांना बोलावले नसेल किंवा डावलले असेल, तर पालकमंत्र्यांनी त्याचा जाब थेट जिल्हाधिकाऱ्यांना विचारणे गरजेचे होते, असे ते म्हणाले.

परंतु तसे न करता राजशिष्टाचाराची पायमल्ली केली जात आहे. शरद पवार साहेबांच्या हाताखाली तयार झालेल्या नेत्यांनी आणि प्रशासनाने नेहमीच प्रोटोकॉलचे पालन केले आहे. आम्ही आजवर अत्यंत शांततेने हा प्रोटोकॉल पाळला आणि कधीही आक्षेप नोंदवला नाही. मात्र, आता प्रशासनाकडून मर्यादा ओलांडल्या जात असून हा प्रकार आता अति व्हायला लागला आहे. ​यापुढे शासकीय कार्यक्रमांमध्ये स्थानिक आमदारांना डावलण्याचे किंवा डावलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

बीड मधील विकास कामाच्या उद्घाटनाला स्थानिक आमदार यांना न बोलवता उपऱ्या आमदारांना सोबत घेऊन पालकमंत्री उद्घाटन करत आहेत, मात्र आम्हाला याबाबत कसलीही कल्पना दिली जात नाही याची तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे केली जाणार असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT