Bhumre-Khaire-Danve News
Bhumre-Khaire-Danve News Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre News : मोर्चात सहभागी न झालेला ठाकरे गट म्हणजे एमआयएमची पिलावळं..

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : आतापर्यंत संभाजीनगरची मागणी करणारा ठाकरे गट प्रत्यक्षात छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यावर मात्र गप्प बसला. खरे शिवभक्त कोण आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बेगडी प्रेम दाखवणारे कोण? हे जनतेच्या लक्षात आले असेल, अशी टीका राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी केली.

हिंदू जनगर्जना मोर्चात ठाकरे गट सहभागी झाला नाही, कारण ते एमआयएमची (Aimim) पिलावळं आहेत, असा आरोप देखील भुमरे यांनी केला. (Shivsena) छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ तसेच लव्ह जिहाद, गो हत्या बंदी कायद्याच्या मागणीसाठी काल सकल हिंदू एकत्रिकरण समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्चाला दगडफेकीच्या घटनांनी गालबोट देखील लागले. परंतु या मोर्चात ठाकरे गट सहभागी झाला नव्हता. यावर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी नामांतर झाले असल्यामुळे हा विषय आम्हाला आता वाढवायचा नव्हता, शिवाय या विषयात राजकारण केले जात असून मोर्चा सकल हिंदूंचा नाही तर राजकीय पक्षांचा होता म्हणून आम्ही त्यात सहभागी झालो नाही अशी भूमिका घेतली होती.

नेमकं यावर बोट ठेवत भुमरे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. माध्यमांशी बोलतांना भुमरे म्हणाले, छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ हा मोर्चा होता. कुण्या एका पक्षाचा किंवा संघटनेचा नव्हता. पण ठाकरे गट या मोर्चात सहभागी झाला नाही. त्यामुळे त्यांचे छत्रपती संभाजी महाराजाबद्दलचे बेगडी प्रेम सिद्ध झाले आहे.

एमआयएमशी ठाकरे गटाचे साटेलोटे आहे, ठाकरे गट म्हणजे एमआयएमची पिलावळंच आहे, असा आरोप भुमरे यांनी केला. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला खरे शिवभक्त कोण आहेत? हे कळाले असेल, असा टोला देखील भुमरे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT