Rahul Gandhi : "सावरकर समझा क्या... नाम राहुल गांधी है"; काँग्रेसने भाजपला डिवचलं

BJP News : परदेशातील वक्तव्यावरून राहुल गांधीनी माफी मागण्याची भाजपची मागणी
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress vs BJP : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून संसदेतही गदारोळ पाहायला मिळाला. राहुल गांधींनी विधानांबद्दल माफी मागायला हवी, अशी मागणी भाजप करीत आहे. मात्र राहुल गांधीच्या भूमिकांचं काँग्रेसकडून समर्थन केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा एक फोटो शेअर करत काँग्रेसने भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) परदेशात भारताची बदनामी केली, त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजप करीत आहे. त्यातच भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधींच्या यांच्या वक्तव्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली होती. पण राहुल गांधींनी या नोटीसीला उत्तर दिले नाही. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) घरावर कारवाई केली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले.

आजही महिलांचे शोषण होत आहे, भारत जोडो यात्रेत अशा अनेक महिला आपल्याला भेटल्या, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी श्रीनगरमध्ये बोलताना केले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, "यात्रेदरम्यान अनेक महिला मला भेटायला आल्या होत्या, त्या रडत होत्या, त्यापैकी काही महिलांनी मला सांगितलं की, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे. त्यांचं लैंगिक शोषण झालं आहे. मी त्या महिलांना म्हणालो की, मी पोलिसांना याबद्दल सांगू का. ते या प्रकरणी कारवाई करतील. त्यावर त्या महिला मला म्हणाल्या की, राहुलजी ही गोष्ट आम्हाला फक्त तुम्हाला सांगायची होती. पोलिसांना याबद्दल काही सांगू नका. अन्यथा आम्हाला अधिक त्रास सहन करावं लागेल."

भाजपने राहुल गांधीच्या परदेशातील आणि भारत जोडो यात्रेतील वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र काँग्रेस राहुल गांधीची बाजू ठामपणे मांडताना दिसत आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक ट्वीट केले आहे. ते ट्वीट आता चर्चेचा मुद्दा बनले आहे. त्यात काँग्रेसने राहुल गांधींचा कारमध्ये बसलेला एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसह एका वाक्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केला आहे. यामध्ये "सावरकर समझा क्या? नाम राहुल गांधी है", असे म्हटले आहे. आता या ट्वीटवरूनही पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com