Minister Bhumre Viral Audio News
Minister Bhumre Viral Audio News Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre News : उद्धवसाहेबांची लय मोठी सभा झाली, साहेब आपल्याला बी घ्यावं लागलं ; कार्यकर्त्याचा हट्ट्..

Jagdish Pansare

Shivsena : महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात झाली. या सभेची चर्चा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अजूनही सुरूच आहे. ` उद्धवसाहेबांची लय मोठी सभा झाली, साहेब आपल्याला बी घ्यावं लागंल`, असा हट्ट जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याकडे त्यांच्या एका कार्यकर्त्याने धरला आहे. या दोघांमधील संभाषणाची आॅडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चे विषय ठरत आहे.

संभाजीनगर पेक्षा आपल्यापैठणमध्ये सभा ठेवा, आणि त्या खैरेंच्या टीकेला उत्तर द्या, असा आग्रह देखील हा कार्यकर्ता धरतांना दिसतो आहे. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेचा धसका विरोधकांनी घेतला आहे. (Shivsena) सांस्कृतिक मंडळावर झालेल्या या सभेने मराठवाड्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधकांनी ही तीन पक्षांची सभा असूनही गर्दी नव्हती, लोक बाहेरून आणले होते, असा आरोप केला आहे.

तर सत्ताधारी शिंदे-भाजपच्या पायाखालची वाळू या सभेने सरकरल्याचा दावा ठाकरे गट व महाविकास आघाडीकडून केला जातोय. शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने देखील या सभेची दखल घेत सभेला तेवढ्या मोठ्या सभेने प्रत्युत्तर द्यावे, असा हट्ट पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे धरला आहे. ५० सेकंदाच्या संभाषणाची एक आॅडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

यात संदीपान भुमरे यांचा कार्यकर्ता महाविकास आघाडीच्या सभेबद्दल त्यांच्याशी बोलतो आहे. हा कार्यकर्ता म्हणतो, साहेब उद्धव ठाकरेंची सभा लय मोठी झाली, गर्दी बी खूप होती. आपल्याला काही करावं लागलं. आपली सभा कधी होणार आहे? यावर भुमरे उत्तर देतात, आपण बी घेवू लवकरच, त्यांची तीन पक्षांची मराठवाड्याची सभा होती, आपण ही लवकरच घेवू.पण साहेब संभाजीगरपेक्षा पैठणला घ्या, आपली एकच सभा त्यांना भारी ठरली पाहिजे, असा कार्यकर्ता आग्रह करतो.

त्यावर मी ठरवलं की तुला सांगतो, असे म्हणत भुमरे त्याला टाळण्याचा प्रयत्न करतात. पण कार्यकर्ता खैरेंनी केलेल्या टीकेची आठवण करून देतो. साहेब ते खैरे तुम्हाला बोलंले ते आपल्याला अजिबात आवडलेलं नाही, त्याला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. ते तुमच्या ढेरीवर बोलले, त्याला उत्तर द्या, तेव्हा वैतागून भुमरे म्हणतात हा उत्तर देवू, मी कळवतो आणि फोन ठेवतात. सध्या या आॅडिओची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT