Sanjay Shirsat On Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्याबद्दल प्रश्न विचारू नका, माझ्यासासाठी तो विषय संपला..

Shivsena : विनयभंगाच्या तक्रारी, खटले दाखल करणे हा अंधारे यांचा छंद आहे. काही जुनी प्रकरणं माझ्याकडे देखील आली आहेत.
Mla Sanjay Shirsat-Sushma Andhre News
Mla Sanjay Shirsat-Sushma Andhre NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी विनयभंग आणि तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यानंतर पुन्हा या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. यावर माध्यमांनी प्रश्न विचारताच मात्र आमदार संजय शिरसाट चांगलेच संतापले.

Mla Sanjay Shirsat-Sushma Andhre News
District Court News : माजी जिल्हा परिषद अध्यक्षाला मारहाण प्रकरणात शिक्षा..

अंधारेंना इतकी प्रसिद्धी का देता? अशाने आपले वजन वाढले असा त्यांचा समज होतो. त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारत जावू नका, माझ्यासाठी तो विषय आता संपला आहे. (Shivsena) त्यांनी पाठवलेल्या नोटीसीला मी कायदेशीरपणे उत्तर देईन, असेही शिरसाट म्हणाले. (Sanjay Shirsat) शिरसाट व अंधारे यांच्यात आता आरोप-प्रत्यारोप आणि कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.

दोन आठवड्यांपुर्वी संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या एका मेळाव्यात बोलतांना अंधारे यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरली होती. यावरून ठाकरे गटाने शिरसाट यांच्याविरोधात रान पेटवले होते. अनेक पोलिस ठाण्यात शिरसाट यांच्या विरोधात विनयभंगाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या शिवाय महिला आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आली होती.

तर काल अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. या सगळ्यावर माध्यमांनी जेव्हा विचारले तेव्हा शिरसाट म्हणाले, अंधारे यांच्याबद्दल प्रश्न विचारत जावू नका, का त्यांना एवढी प्रसिद्धी तुम्ही लोक देत आहात. माझ्या दृष्टीने हा विषय संपला आहे. माझ्यावर त्यांनी जो गुन्हा, दावा दाखल केला आहे, त्याला मी कायदेशीरपणे उत्तर देईन.

विनयभंगाच्या तक्रारी, खटले दाखल करणे हा अंधारे यांचा छंद आहे. काही जुनी प्रकरणं माझ्याकडे देखील आली आहेत. २०१२ मध्ये त्यांनी अशाच प्रकारे दोन तरुणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. पुढे न्यायालयात हे दोन्ही तरूण निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. तर अशी अनेक प्रकरणं आहेत, त्यामुळे त्यांना काय करायचे ते करू द्या, कृपया मला त्यांच्याबद्दल विचारत जावू नका, अशी विनंती देखील शिरसाट यांनी माध्यमांना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com