Minister Sandipan Bhumre-Khaire News Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre On Khaire News : टक्केवारीच्या आरोपाने भडकलेल्या भुमरेंकडून खैरेंचे डिपाॅझीट जप्त करण्याचा दावा....

Marathwada : मी असो की इतर कुणाला पक्षाने उमेदवारी दिली तरी खैरेंना पराभूत करणार म्हणजे करणारच.

सरकारनामा ब्युरो

Shivsena V/s Shivsena : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर काल टक्केवारी घेवून काम करत असल्याचा गंभीर आरोप केला होता.(Sandipan Bhumre On Khaire News) शिवाय मतदारसंघ किंवा जिल्ह्याचा विकास न करता भुमरे यांनी स्वतःचा विकास करत दारुची दुकाने वाढवली, असा टोलाही खैरेंनी लगावला होता.

या आरोपांनी भडकलेल्या भुमरेंनी खैरेंचे लोकसभा निवडणुकीत डिपाॅझीट जप्त केले नाही, तर भुमरे आडनाव सांगणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेतला आहे. (Eknath Shinde) शिंदे गटाने केलेले बंड आणि त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर तेव्हापासून ठाकरे विरुद्ध शिंदे सेना यांच्यात कायम संघर्ष झडत आहे.

त्यात शिंदे यांच्या बंडाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळाला होता.(Shivsena) पाच पैकी चार आमदार शिंदेसोबत गेल्याने जिल्ह्यातील ठाकरे गटाची ताकद कमी झाली होती. (Chandrakant Khaire) परंतु गेल्या वर्षभरात शिंदे गटाला ठाकरे गटाचा मोठा नेता, पदाधिकारी गळाला लावणे शक्य झाले नाही. सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्या पक्षांची तयारी सुरू आहे.

त्यामुळे एकमेकांवर आरोप करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. ठाकरे गटाचे नेते व आगामी लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगरचे संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते चंद्रकांत खैरे शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर काल खैरेंनी थेट टक्केवारीचा आरोप केला. त्याला भुमरे यांनी प्रत्युत्तर देतांना खैरे यांनाच टक्केवारीची सवय आहे, त्यांच्या मुलगा टक्केवारी घेतो असे म्हणत पलटवार केला.

एवढेच नाही, तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खैरे समोर आले तर त्यांचे डिपाॅझीट जप्त केले नाही, तर भुमरे आडनाव सांगणार नाही, अशा शब्दात आव्हान देखील दिले. मी असो की इतर कुणाला पक्षाने उमेदवारी दिली तरी खैरेंना पराभूत करणार म्हणजे करणारच, असे म्हणत भुमरे यांनी दंड थोपटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT