Marathwada : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. (Ncp Claim Jalna Loksabha News) आघाडीतील तीनही पक्ष स्वतंत्रपणे ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. आधी जिंकलेल्या जांगाशिवाय एकमेकांच्या काही मतदारसंघावर दावे-प्रतिदावे केले जात असल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याचा विचार केला तर शिवसेना (ठाकरे गट) छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, धाराशीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. तर काॅंग्रेसच्या वाट्याला लातूर आणि नांदेड हे मतदारसंघ येवू शकतात. (Ncp) राष्ट्रवादी बीड आणि जालना मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. पैकी जालना लोकसभा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षापासून काॅंग्रेस लढत आली आहे.
गेल्या पाच लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसला (Jalna) जालना मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे या मतदारंसघात भाकरी फिरवण्याचा प्रयोग केला जावू शकतो. राष्ट्रवादी काॅंग्रेसने जालना मतदारसंघावर दावा सांगितल्याने (Mahavikas Aghadi) काॅंग्रेसच्या भुवया उंचावल्या आहे. राष्ट्रवादीच्या लोकसभा आढावा बैठकीत जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी हा दावा केला आहे.
राजेश टोपे यांना उमेदवारी दिली जावी, असे मत देखील या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. परंतु राष्ट्रवादीमध्य लोकसभा लढवण्यास इच्छूक नसणाऱ्यांमध्येच टोपे यांचे देखील नाव असल्याने चर्चा होताच त्यांनी नकार घंटा वाजवल्याचे बोलले जाते. घनसांवगी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले टोपे आपली तयारी नसल्याचे कारण देत लोकसभा लढवण्यास असमर्थता दर्शवत आहे.
भाजपच्या रावसाहेब दानवे यांना पराभूत करायचे असेल तर ताकदीचा उमेदवार द्यावा लागणार आहे. टोपेंनी नकार दिल्यामुळे आता राष्ट्रवादीने भोकरदनचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नावावर विचार सुरू केल्याचे समजते. दुसरीकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघावर काॅंग्रेसकडून दावा केला जात आहे. या मतदारसंघात काॅंग्रेसने तीनवेळा विजय मिळवला आहे.
सर्वात आधी ८० ते ८९ च्या दरम्यान उत्तम राठोड हे लोकसभेवर निवडून गेले होते, तर सुर्यकांता पाटील आणि राजीव सातव यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. काॅंग्रेसचे या जिल्ह्यात संघटन असले तरी महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडावा लागणार आहे. कारण विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले होते.
त्यामुळे ठाकरे गट ही जागा कदापी सोडणार नाही. जालन्याच्या जागेवर तडजोडीची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबदल्यात काॅंग्रेसला राज्यातील अन्य एखादा मतदारसंघ दिला जावू शकतो असे बोलले जाता. अर्थात अद्याप जागा वाटपाची अंतिम बैठक झालेली नाही. मात्र जालन्यातून राष्ट्रवादी तर हिंगोलीतून काॅंग्रेस लढण्यास इच्छूक असल्याने स्थानिक नेत्यांना बळ देण्याची तयारी देखील दोन्ही पक्षांनी सुरू केल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.