Minister Sandipan Bhumre news, Aurangabad
Minister Sandipan Bhumre news, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Sandipan Bhumre : ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर, तरी आम्हाला गद्दार म्हणतात..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad News : उठसूठ गद्दार आणि पन्नास खोके म्हणत शिंदे गटाची बदनामी करायची हा एक कलमी कार्यक्रम शिवसेना आणि संजय राऊत यांनी चालवला आहे. आम्ही गद्दार असतो, खोके घेतले असते तर जनता आमच्यासोबत राहीली असती का? ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदेगटाच्या युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या, जिल्ह्यात ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर आहे, याकडे त्यांनी लक्ष द्यावं, असा टोला Guardian Minister पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी संजय राऊत आणि उद्धवसेनेला लगावला.

शहरातील संपर्क कार्यालयात भुमरे यांनी पैठण तालुक्यातील सरपंचाचा सत्कार आयोजित केला होता. (Marathwada) यावेळी तालुक्यातील २५ पैकी २० सरपंच आपल्या गटाचे निवडून आल्याचा दावा देखील करण्यात आला. शिंदे सरकारमधील गद्दार आमदार, मंत्र्यांनी घेतलेल्या ५० खोक्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा, अशी मागणी (Shivsena) शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकतीच केली होती.

यावर प्रतिक्रिया देतांना भुमरे म्हणाले, संजय राऊत यांना सध्या काही काम राहिलेले नाही. सकाळी उठले की माध्यमांसमोर जाऊन गद्दार, ५० खोके एवढंच ते बोलतात. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षात काय केले? हे सांगण्यासारखे नसल्यामुळे ते एकाच मुद्याभोवती फिरत आहेत. पण फक्त आरोप करून चालतं नाही त्यांनी खोके घेतल्याचे सिद्ध करून दाखवावे.

राहिला प्रश्न गद्दारीचा तर आम्ही गद्दारी केली असती, खोके घेतले असते तर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला असता का? ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदेगट आणि भाजप युतीला मतदारांनी भरभरून आशिर्वाद दिले आहेत. ठाकरे गट जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर गेला आहे. लोकांची कामं करावी लागतात, तेव्हा लोक विश्वास ठेवतात. फक्त खोटे आरोप आणि बदनाम केल्याने काही होत नाही.

लोक आमच्या पाठीशी आहे हे ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे त्यांना काय आरोप करायचे ते करू द्यात, एसआयटी चौकशी करायची तर करू द्या, आमची तयारी आहे, असे आव्हान देखील भुमरे यांनी संजय राऊत यांना दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT