...अन्‌ संतापलेले आमदार प्रदर्शनाचे उद्‌घाटन न करताच निघून गेले

आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतः मैदानाची स्वच्छता सुरु केली.
MLA Shyamsunder Shinde
MLA Shyamsunder ShindeSarkarnama
Published on
Updated on

माळाकोळी (जि. नांदेड) : नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले, पशुसंवर्धन विभागाचे पशुप्रदर्शन यावर्षी अनेक कारणांमुळे चर्चेत येत आहे. पशुप्रदर्शन स्थळाची दुरवस्था असून सुविधांअभावी काही अश्व जखमी झाल्याच्या तक्रारींचा पाढा पशुपालकांनी आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsunder Shinde) यांच्यासमोर वाचला. त्यामुळे संतप्त झालेले आमदार शिंदे प्रदर्शनाचे उद्‍घाटन न करताच निघून गेले. आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतः मैदानाची स्वच्छता सुरु केली. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. (...The enraged MLA left without inaugurating the exhibition)

पशुप्रदर्शनस्थळी स्वच्छता, पाणीपुरवठयाचा अभाव आहे. पशु व पशुपालकांसाठी मंडपाचीही व्यवस्था नाही. त्यांना उन्हात थांबवले गेले. मैदानातील दगड लागल्यामुळे एक घोडा जखमी तर दूषित पाण्यामुळे एका घोड्याचा मृत्यू झाल्याचे पशुपालकांनी सांगितले. प्रदर्शनाच्या उद्‍घाटनासाठी आलेल्या शिंदे यांच्यासमोर पशुपालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी आमदार शिंदे यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांना तातडीने बोलावून घेत जाब विचारला. मात्र, माळोदे हेही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.

MLA Shyamsunder Shinde
शिवसेना आमदार वैभव नाईकांचे टेन्शन वाढले : भाजपची वाढलेली ताकद ठरणार त्रासदायक

यात्रा बंद पाडण्याचा डाव; लक्षवेधी मांडणार

माध्यमांशी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, ‘जिल्हा परिषदेने महिनाभरापासून यात्रा तयारीचा केवळ फार्स केला आहे. प्रत्यक्षात कुठल्याही सुविधा यात्रेत नाहीत. पाणीपुरवठा, मैदानाच साफसफाई आदी बाबीही पूर्ण केल्या नाहीत. मैदानातील दगड लागल्यामुळे २५ लाखांचा जिंतूर येथील घोडा जखमी झाला. अन्य एका ठिकाणी दूषीत पाण्यामुळे घोडा दगावला. अशीच स्थिती राहिली तर व्यापारी यात्रेत कसे येतील? जिल्हा परिषदेने माळेगाव यात्रा बंद पाडण्याचा विडा उचलला आहे का? पशुपालकांच्या नुकसानीची भरपाई कोण करणार? यात्रेतील असुविधांबाबत विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहे.’

MLA Shyamsunder Shinde
मी ना राष्ट्रवादीचा ना शिवसेनेचा; मी सरपंच ‘गावविकास’चा!

झेडपी प्रशासनला धरले धारेवर

आमदार शिंदे यांनी पशुपालकांची बाजू घेत जिल्हा परिषद प्रशासनाला धारेवर धरले. प्रत्येक विभाग आपली जबाबदारी झटकत इतरांवर ढकलत होता. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश देताच सर्वांची धावपळ सुरु झाली. आमदार शिंदे यांच्यासह आशाताई शिंदे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com